Home महत्वाची बातमी दिव्यांग वृध्द निराधार यांना पंधरा दिवसांत न्याय नाहि मिळाल्यास दिव्यांग झोपा काढो...

दिव्यांग वृध्द निराधार यांना पंधरा दिवसांत न्याय नाहि मिळाल्यास दिव्यांग झोपा काढो आंदोलन बिलोली तहसिलदारच्या दालनात करण्याचा दिव्यांग शिष्टमंडळ ने निवेदनाद्वारे दिला इशारा

193

संजयकुमार बिलोलीकर

नांदेड / बिलोली — दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुचेलीकर यांनी नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तहसिलदार साहेब यांना दिव्यांग वृध्द निराधार यांच्या पाच प्रमुख मागण्या साठि पंधरा दिवसात त्यांचा हक्क द्या नसेल तर प्रत्येक तालुक्यात प्रशासन यांना जागे करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या आदेशानुसार बिलोली तहसिलदार साहेब यांना निवेदनाद्वारे दिला इशारा प्रशासन दिनदुबळ्या दिव्यांग वृध्द निराधाराना तहसिल मार्फत अनेक योजनेत अनुदान दिले जाते त्यात त्यांना दोन वेळेचे दुधाचे पाकीट येत नाहि तरी ते अनुदान चार महिने मिळत नाहि.अशा दिनदुबळ्याना आधार देण्याऐवजी प्रशासन बेघर करित असुन शासन व वरिष्ठ अधिकारी अनेक लेखी आदेश देऊन त्यांची कनिष्ठ अधिकारी आदेशाला केराची टोपली दाखवत असल्यामुळे दिव्यांग वृध्द निराधार यांना केंद्र सरकारने दरमहा मिळणारे अनुदान एप्रिल, मे, जुन तिन महिने दुप्पट एकरकमी खात्यात देण्याचे आदेश २६ मार्चला देऊन त्यांची अंमलबजावणी करण्याऐवजी राज्य शासनाने तिन महिने ५००रू वाढ दिले ते तर केंद्र शासनाच्या योजनेच्या लाभार्थ्यांना दिले असे सांगितले जाते जास्तीचे लाभार्थी राज्य शासनाच्या योजनेत असताना त्यांना लाभ काय दिला जात नाहि? ते सर्व लाभार्थ्यांना केंद सरकारने घोषित केलेल्या योजनेची अंमलबजावणी करावी .व नेहमी मिळणारे अनुदान चार महिन्या पासून मिळत नसल्यामुळे सर्व उपाशी राहाण्याची वेळ आली आहे. 

जागतिक संकटकाळी दिव्यांग वृध्द निराधार यांना अंत्योदय योजनेत समाविष्ट करून त्यांना लाभ देण्याचे लेखि आदेश देऊन सुध्दा अंमलबजावणी केली जात नाही.अशा संकटकाळी भुकमारी होऊ नये म्हणून धान्य किट पुरवठा करण्याचे आदेश देऊन सुध्दा अंमलबजावणी केली जात नाही.संजय गांधी, ईतर योजनेत पाञ लाभार्थी निवड आठ ते दहा महिने होत नाही.निवड झालेल्या पाञ लाभार्थ्यांना मंजुरीनंतर सहा महिने अनुदान मिळत नाहि व नामंजूर किव्वा मंजुर झालेले कळविण्यात येत नाही.दिव्यांग बांधताना विनाअट अंत्योदय योजनेत समाविष्ट करून त्यांना राषण कार्ड देऊन आधार द्यावा,संजय गांधी निराधार योजनेच्या कमिटीत दिव्यांग बांधवांना सदस्य यांची निवड शासन आदेश असुन त्यांची अंमलबजावणी केली जात नाहि नसल्याने दिव्यांग वृध्द निराधार यांना उपासमारीने राहाण्याची वेळ आल्याने वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष वेधण्यासाठी विभागीय आयुक्त औरंगाबाद दिव्यांग आयुक्त पुणे,जिल्हाधिकारी नांदेड,मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.नांदेड,समाज कल्याण अधिकारी जि.प.नांदेड यांना तहसिलदार नायगाव यांच्या मार्फत दिनदुबळ्या उपेक्षित दिव्यांग वृध्द निराधार यांना पंधरा दिवसांत न्याय देण्याचे आदेश देऊन द्यावा जर न्याय नाहि मिळाल्यास दिव्यांग वृध्द निराधार यांच्या प्रश्नांसाठी दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली तहसिलदार यांच्या दालनात झोपा काढो आंदोलन करण्यात येईल ही वेळ येऊ देऊ नये असे निवेदन दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र बिलोली तालुका अध्यक्ष रामल्लु मोगरेवार ता ऊपअध्यक्ष बालाजी होनपारखे, संतोष नरवाडे,शंकर म्हैञे, बाबू पिरसाब, हाजुमिया चांदसाब ईत्यादी कार्यकर्त्यांनी दिला.