Home बुलडाणा पालकमंत्री महोदय यांच्या बद्दल सोशल मीडिया वर अपशब्द वापरणाऱ्या वर कार्यवाही ,

पालकमंत्री महोदय यांच्या बद्दल सोशल मीडिया वर अपशब्द वापरणाऱ्या वर कार्यवाही ,

555

 

साखरखेर्डा पोलिसांची कामगिरी ,

गोपाल रामसिंग शिराळे ,

साखरखेर्डा प्रतिनिधी ,

गेल्या काही दिवसा
पूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ , राजेंद्र शिंगणे यांनी लोकांच्या हिता साठी वाढते करोना संक्रमण रोखण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात जनता कर्फ्यु ची घोषणा केली होती त्या वरून चिडून बंडू आघाव रा , दुसरबीड याने मा , मंत्री महोदय यांच्या विषयी सोशल मीडिया वर गैरउदगार काढले होते या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे नेते कार्यकर्ते संतप्त झाले होते या प्रकरणी सिंदखेडराजा पंचायत समिती चे माजी सभापती राजू ठोके यांनी साखरखेर्डा पोलिसात तक्रार दाखल केली होती दाखल तक्रारीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप तडवी यांच्या मारगदर्शनाखाली ठाणेदार संग्राम पाटील , पो , उप निरीक्षक दीपक राणे , पो , हे ,का , गणेश डोईफोडे यांनी आरोपी विलास उर्फ बंडू आघाव याच्यावर भा , द , वि , 500 , 504 , नुसार तक्रार दाखल करून आरोपी वर 116 , व 107 नुसार प्रतिबंधक कार्यवाही केली व त्यास ताब्यात घेण्यात आले ,

सोशल मीडिया चा वापर जपून करा  ठाणेदार संग्राम पाटील ,

व्हाट्सएप फेसबुक सोशल मीडिया चा वापर जपून करा कोणाची बदनामी होईल शांतता भंग होईल असे कृत्य करू नका अशी पोस्ट टाकू नका कॉमेंट करतांनाही विचार पूर्वक कॉमेंट करा तुम्ही जर याचे पालन केले नाही तर गंभीर स्वरूपाची कार्यवाही केली जाईल असे आवाहन ठाणेदार संग्राम पाटील यांनी नेटकर्यांना केले आहे ,