Home बुलडाणा बोर्डी नदीच्या पुराच्या पाण्यात तिघे गेले वाहून बाप लेकाचा समावेश , “दुःखद...

बोर्डी नदीच्या पुराच्या पाण्यात तिघे गेले वाहून बाप लेकाचा समावेश , “दुःखद घटना” अमीन शाह

196
0

अमीन शाह

बुलडाणा – खामगाव तालुक्यातील माक्ता येथील दिलीप नामदेव कळसकार 38 ,गजानन लहानु रणसिंगे 36 यांचा मुलगा राहुल गजानन रणसिंगे 16 हे तिघे बकरी चारत होते. बकरी नदीत पडल्याने या दिलीप कळसकार बकरी वाचवन्यासठि प्रयत्न करीत असताना त्यांचा पाय घसरला मात्र नदीचा प्रवाह जास्त असल्यामुळे तिघेहि पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले त्यामध्ये दिलीप नामदेव कळसकार हे नदीपात्रात नागरिकांना दिसून आले नागरिकांनी त्यांना मृतावस्तेत बाहेर काढले घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोहे का मनोहर कोल्हे यांनी घटनेचा पंचनामा करुन शवविच्छेदनास पाठवले होते इतर दोघांचा शोध घेणे सुरू आहे.

मृतक यांना एक मुलगा मुलगी असुन ते शेती करतात. त्यांच्या अश्या दुःखद घटने मूळे गावावर शोककळा पसरली आहे .