Home बुलडाणा पुरात अडकलेल्याना वाचविण्यासाठी गेलेला युवकाचा दुर्देवी मृत्यू 

पुरात अडकलेल्याना वाचविण्यासाठी गेलेला युवकाचा दुर्देवी मृत्यू 

487
0

कोराडी प्रकल्प वर ची घटना…!

अमीन शाह

बुलडाणा – मेहकर तालुक्यातील कोरोडी प्रकल्पाच्या सांडव्यात पोहण्यासाठी आज सकाळी तीन मुले गेले होते मात्र अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे ते सांडव्यात अडकले होते . पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जात असताना सुदैवाने त्यांना सांडव्यातील झाडाचा आधार मिळाल्याने ते तिथेच अडकले होते . ही बाब गावकऱ्यांना व प्रशासनाला माहीत पडतातच गावकरी तहसिलदार , ठाणेदार पोलीस कर्मचारी महसूल कर्मचारी व इतर कर्मचारी व हे त्या तिघांना वाचविण्यासाठी कोरडी प्रकल्पा वर तळ ठोकून होते चार युवक ही त्यांना वाचविण्यासाठी पुराच्या पाण्यात उतरले होते मात्र त्यांना वाचवता वाचवता दे , माली येथील रहिवासी युवक विजय सुरुशे हा पुराच्या पाण्यात पळून जखमी झाला होता त्याला उपचारासाठी दवाखान्यात नेले असता त्याचा दुर्देवी मृत्यू झाला झाला असल्याची खात्री लायक माहिती मिळाली आहे जिल्ह्यात दमदार पाऊस झाला . त्यातल्या त्यात मेहकर तालुक्यात हा पाऊस अधिक होता . त्यातच कोरोडी प्रकल्प तुडुंब भरल्याने त्याच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग होत आहे . त्यामुळे पोहोण्याचा मोह न आवरल्याने देऊळगाव माळी येथील तीन मुले सकाळीच कोराडी प्रकल्पाच्या सांडव्यावर पोहण्यास गेले होते . निसर्गरम्य वातावरण व खळखळणारे पाणी पाहता या तिघांनी पाण्यात उड्या घेतल्या . मात्र पाण्याचा प्रवाह अचानक वाढला तथा एकंदरीत पाण्याच्या प्रवाहाचा अंदाजही या तिघांना आला नाही . मात्र सुदैवाने सांडव्याच्या परिसरात असलेल्या झाडाचा या तिघांना आधार मिळाला . त्याला धरून ते सुरक्षीत झाले होते , सध्या जो युवक पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे त्याचा शोध घेतला जात आहे , युवकाच्या अश्या दुर्देवी मृत्यू झाल्या मूळे गावावर शोककळा पसरली असून दुःख वायकत केले जात आहे .