Home बुलडाणा पिकांना रासायनिक खत देण्याबाबत कृषिकन्याचे मार्गदर्शन..

पिकांना रासायनिक खत देण्याबाबत कृषिकन्याचे मार्गदर्शन..

432

पिकांना रासायनिक खत देण्याबाबत कृषिकन्याचे मार्गदर्शन..
( रवि जाधव )
देऊळगाव राजा : देऊळगाव राजा येथील समर्थ कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्या ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमातर्गत खते देण्याबाबतची संपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले आहे. समर्थ महाविद्यालयात चतुर्थ वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थीनी कृषीकन्या कु. मनिषा सुरेश वायाळ या विद्यार्थीनीने कृषि कार्यानुभव अंतर्गत खते कशी वापरावी या बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
मेरा बु.गावातील शेतकऱ्यांना रासायनिक खते कोणती वापरावी,कशी वापरावी आणि किती प्रमाणात वापरावी तसेच वेळेनुसार केव्हा वापरावी या बाबत शेतकर्यांना मार्गदर्शन केले . सध्या मुंग, उडीद,व कपाशी, मिरची, पिकावर मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्यांची कमतरता आढळून येत आहे.आणि शेतकऱ्यांना कोरोनाच्या काळात मोलाचे मार्गदर्शन लाभले शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. व्यवस्थापण आणि नियोजन त्यातच शेतकऱ्यांच्या होणारा खर्च त्यामुळे शेतकऱ्यावर आता व्यवस्थित खते देण्याची वेळ आली आहे. असे संपूर्ण खतांबाबतचे मार्गदर्शन कु.मनीषा सुरेश वायाळ यांनी केले आहे या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य. नितिनजी मेहेत्रे सर प्रा. मोहजीतसिंग राजपूत सर प्रा .अरविंद देशमाने सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले