Home महत्वाची बातमी पत्रकार दिनानिमीत्य विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन…!

पत्रकार दिनानिमीत्य विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन…!

262

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

यवतमाळ / अकोला बाजार , दि. ०८ : – ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षे मध्ये टिकु शकत नाही असा न्यूनगंड न बाळगता नियमीत मासीके,वृत्तपत्र याचे नेहमी वाचन करून सकारात्मक विचार करावा, मोबाईलचा सदुपयोग केल्या स तुम्ही सुद्धा स्पर्धा परीक्षे मध्ये यश संपादन करने अवघड नाही असे प्रतिपादन यवतमाळच्या उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर यांनी विद्यार्थाना स्पर्धा परीक्षे विषयी मार्गदर्शन करताना केले.

बाजार येथील लक्ष्मिबाई कावळे महाविद्यालयात यवतमाळ जिल्हा पञकार संघटना तालुका यवतमाळ यांचे वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी करण्यात आली .या दिनाचे औचित्य साधुन महाविद्यालयीन विद्यार्थाना स्पर्धा परीक्षे विषयी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्याकमाचे अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणुन वडगाव जंगल.चे ठाणेदार नरेश रणधीर ,महाविद्यालयाचे प्राचार्य सतीश पाटील, प्राचार्य मिलींद गजभिये हे उपस्थीत होते.

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

प्रा. सतीश पाटील यांनी केले.
यावेळी माधुरी बावीस्कर मार्गदर्शन करताना पुढे म्हणाल्या की चिकाटी, सयम व सकारात्मक विचार हे स्पर्धा परीक्षेचे मुळमंञ असुन मोबाईल चा वापर वाॅट्सअप व पब्जी साठी न करता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी करावा.
ठाणेदार नरेश रणधीर यांनी स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांशी संवाद साधला.प्राचार्य गजभिये यांनी यावेळी विद्यार्थांना मार्गदर्शन केले .

कार्यक्रमाचे संचालन हमीद खाॅ पठाण यांनी केले तर आभार प्रा. चकुले यांनी केले.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी पत्रकार बाबाराव देवकते, प्रविण राठोड, भगवान चहांदे, सचिन चहांदे, भालचंद्र कलाने , पोलीस पाटील राजेश काटपेलवार विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.