बुलडाणा

सदधम्म सेवा संघाचे संस्थापक मोतीरामजी घाटे यांचे निधन

Advertisements
Advertisements

वानखेड‌‌ – ता. संग्रामपूर, जि. बुलडाणा येथील प्रतिष्ठीत नागरिक मोतीरामजी श्रीपत घाटे (वय 71) यांचे रविवार दि. 02.08.2020 रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वानखेड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

संग्रामपूर तालुक्यातील बौध्द धम्म चळवळीचे ते उर्जा केंद्र होते. सन 1972 मध्ये श्रीलंका येथील भंते वजीराबुध्दी यांच्या उपस्थितीत धम्मदिक्षा घेऊन धम्मदिक्षेचा मोठा सोहळा आयोजित केला होता. बौध्द धम्माच्या प्रचार प्रसारासाठी त्यांनी सदधम्म सेवा संघाची स्थापना केली. तसेच कष्टकरी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्या न्याय हक्काच्या प्रतिष्ठापनेसाठी श्रमीक बहुउद्देशीय संस्थेची स्थापना केली. गावातील मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी त्यांनी स्वतःचे घर उपलब्ध करून दिले. संग्रामपूर तालुक्यातील परिवर्तनवादी चळवळीचे ते ऊर्ध्वयू होते. त्यांच्या निधनामुळे शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा , सुन‌, मुली‌, जाव ,, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

बुलडाणा

पालकमंत्री महोदय यांच्या बद्दल सोशल मीडिया वर अपशब्द वापरणाऱ्या वर कार्यवाही ,

  साखरखेर्डा पोलिसांची कामगिरी , गोपाल रामसिंग शिराळे , साखरखेर्डा प्रतिनिधी , गेल्या काही दिवसा ...
बुलडाणा

बोर्डी नदीच्या पुराच्या पाण्यात तिघे गेले वाहून बाप लेकाचा समावेश , “दुःखद घटना” अमीन शाह

अमीन शाह बुलडाणा – खामगाव तालुक्यातील माक्ता येथील दिलीप नामदेव कळसकार 38 ,गजानन लहानु रणसिंगे ...
बुलडाणा

पुरात अडकलेल्याना वाचविण्यासाठी गेलेला युवकाचा दुर्देवी मृत्यू 

कोराडी प्रकल्प वर ची घटना…! अमीन शाह बुलडाणा – मेहकर तालुक्यातील कोरोडी प्रकल्पाच्या सांडव्यात पोहण्यासाठी ...