Home महत्वाची बातमी वर्ध्यात पत्रकारदिनी ग्रामिण भागात उत्कृष्ट पत्रकारीता करणाऱ्या पत्रकार व समाजसेवकांचा गौरव

वर्ध्यात पत्रकारदिनी ग्रामिण भागात उत्कृष्ट पत्रकारीता करणाऱ्या पत्रकार व समाजसेवकांचा गौरव

695

सौ. पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. ०६ :- आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र शाखा वर्धा जिल्ह्याच्या वतीने स्थानिक मातोश्री सभागृहात पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रामदास तडस प्रामुख्याने उपस्थित होते. तर पञकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पञे मंचकावर उपस्थित होते.

यावेळी ग्रामिण भागात उत्कृष्ट पत्रकारी करीत तळागळातील समस्यांना वाच्या फोडणाऱ्या पत्रकार व सदैव समाजासाठी धडपड करणाऱ्या समाजसेवकांना गौरविण्यात आले. आपल्या लेखनातून ग्रामिण भागातील समस्यांना वाचा फोडण्यारे प्रतिनिधी विलास नवघरे, पत्रकार लालसिंह ठाकुर, चेतन वाघमारे, आरोग्य विभागाचे डाॅ.दीपक कोल्हटकर, सामाजिक कार्यकर्ते जब्बार तंवर, कविश्वर जारूंडे , सौ.रेखा झाझंडे यांचासह पत्रकार व.समाजसेवकांना खासदार रामदास तडस यांचे हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

या वेळी खासदार रामदास तडस उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन करताना म्हणाले की पत्रकार हा चौथा स्तंभ असुन तो आपल्या लेखनातून, कॅमेरातून दिवस रात्र उन पाऊस थंडी याची तमा न बाळगता सत्त समाजासाठी स्वताला झोकून टाकणारा एकमेव प्राणी आहे. या संपूर्ण कार्यक्रमा येशस्विरीत्या पारपाडण्या करीता रविराज घुमे, शेख सत्तार, संजय धोंगडे, योगेश कांबळे, ईकबाल शेख, विनोद महाजन दिलीप पिंपळे,गजानन गारघाटे,विनोद महाजन, सतिश काळे , गणेश शेंडे सह पत्रकार संरक्षण समितीच्या सदस्यांनी परीश्रेम घेतले.

.