Home बुलडाणा
149
पालकमंत्री डॉ , राजेंद्र शिंगणे , यांच्या ताब्यात असलेली सिंदखेड राजा तालुक्यातील राताळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच असलेले डॉ.अर्जुन म्हसाजी जाधव यांनी ग्रामपंचायत अंतर्गत राजकीय ठरावानुसार आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर तारीख ५ ऑगस्ट रोजी बुधवारी ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. ग्रामपंचायत मधील सदस्यांनी ठरविल्यानुसार अर्ज सादर करण्याच्या वेळेपर्यंत सौ.वर्षा राजू खिल्लारे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला. त्यामुळे वर्षा राजू खिल्लारे यांची उपसरपंचपदी निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक अमित रामभाऊ जाधव यांनी काम पाहिले.
यावेळी सरपंच अलका भानुदास लव्हाळे, अर्जुन जाधव, दीपक मनोहर गव्हाड, चंद्रकला भानुदास पाटील, गीता खुशालराव पाटील, ज्ञानेश्वर मोहनाजी सरकटे, अर्चना परमेश्वर गवई हे ग्रा. पं. सदस्य उपस्थित तसेच भानुदास लव्हाळे, दशरथ जाधव, मुरलीधर लव्हाळे, भानुदास पाटीलबुवा पाटील, वसंत सरकटे, सुनील पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते,