Home विदर्भ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बार्टी द्वारे ऑनलाईन प्रबोधनाचे कार्य सुरू

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बार्टी द्वारे ऑनलाईन प्रबोधनाचे कार्य सुरू

115

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

बार्टी द्वारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती प्रबोधन सप्ताहाचे आयोजन…

वर्धा – महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या वतीने एक ऑगस्ट ते पाच ऑगस्ट पर्यंतच्या या पाच दिवसांच्या कालावधीत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त 70 कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात येत आहे .तसेच वर्धा व नागपूर जिल्ह्याचे प्रकल्प अधिकारी दिनेश बारई यांनी सदर माहिती प्रतिनिधीशी बोलताना दिली. वर्धा जिल्यात समतादूत वर्धा येथे स्वप्नील चवरे व कारंजा सिध्दार्थ सोमकुवर, आष्टी विनायक भांगे, देवळी रुपाली ठाकरे व आर्वी बंश्री परतेती यांनी या तालुक्यात साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कार्य विषयी सभा आयोजित करून जिल्यातील मार्गदर्शकाद्वारे ऑनलाईन द्वारे प्रबोधनाचे कार्य करून अण्णाभाऊं साठेंच्या कार्याचा प्रचार व प्रसार करून जनजागृती करण्यात येत आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली व डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे या संस्थेचे महासंचालक माननीय कैलास जी कणसे यांच्या आदेशाने व समता दूत प्रकल्पाच्या मुख्य प्रकल्प संचालिका माननीय प्रज्ञा वाघमारे यांच्या संकल्पनेतून हा सर्व जयंती सोहळा पार पडत आहे.यात वर्धा व नागपूर जिल्हा प्रकल्प अधिकारी दिनेश बारई अथक परिश्रम घेत आहे.
कारंजा तालुक्यात पार पडलेल्या ऑनलाईन प्रबोधन कार्यक्रम खूप सुंदर रित्या पार पडला. साहित्यरत्न अण्णाभाऊंच्या वाटेगाव ते मुंबई प्रवासाचे वर्णनं अतिशय सुंदर पद्धतीने राष्ट्रीय युवा प्रबोधनकार विकासराजा भारती यांनी यांनी केले.या कार्यक्रमाचे आयोजन कारंजा तालुक्याचे समतादूत सिध्दार्थ सोमकुवर यांनी केले होते.श्रोत्यांनि चांगला सहभाग दर्शवून समाधान व्यक्त केले.