बुलडाणा

समाधान शिंगणे यांच्या वतीने देऊळगाव मही येथे हायपोक्लाराईड ची फवारणी

Advertisements
Advertisements

समाधान शिंगणे यांच्या वतीने देऊळगाव मही येथे हायपोक्लाराईड ची फवारणी

देऊळगाव मही(रविंद्र जाधव):- आज महाराष्ट्रभर कोरोनाने थैमान घातले आहे.परन्तु मागील 3 महिन्यात देऊळगाव मही गावात एकही कोराना रुग्ण नसल्याने गावभर आनंदाचे वातावरण होते.
परंतु मागील आठवड्यात एक रुग्ण आढळला व बघता बघता संख्या तीन वर गेली यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.अश्या परिस्थितीत सोशल मीडियावर सामान्य जनता ग्रामपंचायत, नेत्यांवर आरोप करतांना दिसत होती, परन्तु ही वेळ आरोप प्रत्यारोप करण्याची सल्ले देण्याची नसून गावाला कोराना मुक्त करण्यासाठी काय करता येईल हा साठी प्रयत्न करण्याची आहे असं मत व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष समाधान शिंगणे यांनी बसस्थानक चौक,वार्ड क्र 4 वार्ड मध्ये क्रमवारी हायपोक्लाराईड ची ट्रॅक्टर द्वारे फवारणी केली.
दिलेल्या शब्दा प्रमाणे शिंगणे यांनी समाज रक्षणाचे कार्य केले म्हणून परिसरात समाधान शिंगणे यांचे कौतुक होत आहे.

आज आरोप ,प्रत्यारोप करून राजकारण करण्याची ही वेळ नाही तर सर्वांनी एकत्र येऊन गाव कसे कोरोनामुक्त करता येईल यासाठी प्रयत्न करायला हवे.गावातील सर्व जबाबदार नेत्यांना,युवकांना,सामाजिक संघटनांना मी आवाहन करतो आपण गावासाठी एकत्र येऊन नियमाचे पालन करूयात,सर्वजण वयक्तिक आप आपआपल्या परीने होईल ती जबाबदारी स्वीकारून आपले कर्तव्य पारपाडूयात. तश्या सुचना आपण करू, घाबरदारी घेऊ तरच आपण कोरोना रुपी राक्षसाविरुद्धचा लढा जिंकू.

समाधान भिकाजी शिंगणे
युवक जिल्हा कार्यध्यक्ष
राष्ट्रवादी

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

बुलडाणा

पालकमंत्री महोदय यांच्या बद्दल सोशल मीडिया वर अपशब्द वापरणाऱ्या वर कार्यवाही ,

  साखरखेर्डा पोलिसांची कामगिरी , गोपाल रामसिंग शिराळे , साखरखेर्डा प्रतिनिधी , गेल्या काही दिवसा ...
बुलडाणा

बोर्डी नदीच्या पुराच्या पाण्यात तिघे गेले वाहून बाप लेकाचा समावेश , “दुःखद घटना” अमीन शाह

अमीन शाह बुलडाणा – खामगाव तालुक्यातील माक्ता येथील दिलीप नामदेव कळसकार 38 ,गजानन लहानु रणसिंगे ...
बुलडाणा

पुरात अडकलेल्याना वाचविण्यासाठी गेलेला युवकाचा दुर्देवी मृत्यू 

कोराडी प्रकल्प वर ची घटना…! अमीन शाह बुलडाणा – मेहकर तालुक्यातील कोरोडी प्रकल्पाच्या सांडव्यात पोहण्यासाठी ...