August 4, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

बायपास की अपघाताचा महामार्ग..?अपघाताची मालिका सुरूच….!

अपघात कसे टाळणार…

शेख हनिफ भाई

देऊळगाव राजा/(प्रतिनिधी):- देऊळगाव राजा शहरा बाहेरून गेलेल्या बायपास रस्त्यावर अवजड वाहनांचे प्रमाण लक्षणीय आहे.
भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनचालकांना अचानक समोर येणाऱ्या वळणामुळे चांगलीच कसरत करावी लागते.वेगात असल्याने बायपास जाफराबाद चौफुल्ली जवळ न दिसनाऱ्या वळणामुळे रोजच छोटे-मोठे अपघात होत आहे.मागील काही दिवसातच फोन मोठे ट्रक याच बायपास चौफुली जवळ पलटी झाले आहे ज्यामुळे मागील काही दिवसात सोशल मीडिया वर ही मोठ्या प्रमाणात चर्चा करण्यात आली व प्रशासनाचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
परन्तु अद्यापही सदर प्रश्न मार्गी लागलेला नाही..
याबाबत शिवसेना नेते ,राष्ट्रवादी नेते व स्थानिक कार्यकर्ते यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहे…
________________
माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी देऊळगाव राजा बायपास वरील धोकादायक जाफ्राबाद चौफुली येथे तात्काळ गरीरोधक टाकण्याची व दिशादर्शक फलक लावण्याची मागणी संबंधित विभागाकडे केली.
लवकरात लवकर हे काम पुर्ण होईल असे संबंधित कार्यकारी अभियंता श्री. झाल्टे साहेब व कनिष्ठ अभियंता श्री. गायकवाड साहेब यांनी सांगितले.

नंदन खेडेकर
शिवसेना नगरसेवक/गटनेते.
देऊळगाव राजा
________________
तत्कालीन सत्ताधाऱ्यांमुळे बायपास चे काम वळणमार्ग धोकादायक झाले व आज त्यामुळेच अपघात होत आहे,या संदर्भात पालकमंत्री मा.राजेंद्रजी शिंगणे यांनी कालच या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग विभागाचे चीफ इंजिनिअर यांच्यासोबत चर्चा करून सदर बायपास अपघात स्थळी गतिरोधाक टाकण्याचे काम लवकरच होणार आहे. यामुळे या धोकादायक स्पॉटवर होत असलेल्या अपघाताचे प्रमाण नक्कीच कमी होईल..
राजीव सिरसाट
तालुका अध्यक्ष
राष्ट्रवादी काँ.पार्टी
________________
बायपास जाफराबाद चौफुली येते अनेक अपघात झाले,आणि प्रत्येक वेळी आम्ही अपघात ग्रस्त वाहनाचे फोटो सोशल मीडिया च्या माध्यमातून लोकप्रतिनिधी पर्यंत पोहोचवले परंतु आज पर्यंत यावर कोणतीही करवाही झाली नाही.
याबाबत लवकरात लवकर काही निर्णय घेण्यात यावा अशी मागणी आमची आहे.
शेख शाकेर
टिपू सुलतान युवा मंच

Advertisements

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!