Home जळगाव सावदा शासकीय विश्रामगृहात भ्रष्टाचार विरोधी मोर्चा दिल्ली ची बैठक संपन्न….!

सावदा शासकीय विश्रामगृहात भ्रष्टाचार विरोधी मोर्चा दिल्ली ची बैठक संपन्न….!

25
0

रावेर (शरीफ शेख)

जळगाव जिल्ह्यातील सावदा शासकीय विश्रामगृहात दि.२७ /०७/२०२० सोमवार रोजी भ्रष्टाचार विरोधी मोर्चा दिल्ली ची बैठक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राहूल जी गंगावणे यांच्या अध्यक्षते खाली पार पडली .या बैठकीत पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले व कार्यकर्त्यांना भ्रष्टाचार विरोधात आवाज उठविणे , अन्याया विरोधात खंबीरपणे उभे राहणे , जन सामान्यांची आवाज उठविणे व जन हिताचे कामं करणे बाबत
सांगितले. बैठकीत जळगांव जिल्ह्यातील तालुका अध्यक्षकांची निवड करण्यात आली.रावेर तालुका अध्यक्ष पदी गणेश मधुकर मनुरे , भुसावळ तालुका अध्यक्ष पदी तुषार भाऊ सुरे , भुसावळ शहर अध्यक्ष पदी संदीप सपकाळे, व जळगांव तालुका अध्यक्ष सुनील जी ब्ह्रामणे यांची फेर निवड करण्यात आली.
या बैठकित भ्रष्टाचार विरोधी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख शेख याकुब शेख नजीर सावदा यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. त्या वेळी कार्यक्रमात जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर बाविसकर ,जिल्हा संपर्क प्रमुख रविंद्र साळवे , भावी जिल्हा अध्यक्ष शांताराम राखुंडे , सुमित अर्जुन सपकाळे, राजकुमार सपकाळे, शैलेश अडकमोल ,सिद्धार्थ जाधव , शुभम हसकर ,शैलेश कासथे , आकाश गवई , विवेक शर्मा ,उदय सोयंके , अनुराग धयंचे , गोलु तायडे , गौतम सोनवणे , राॅनी राॅस , शुभम सोनवणे , आकाश चौधरी व इतर कार्यकर्ते बैठकिला हजर होते.
नवीन निवड झालेल्या पदाधिकाय्रांचे अभिनंदन व कौतुक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राहूल जी गंगावणे व प्रदेश संपर्क प्रमुख शेख याकुब शेख नजीर यांनी केले आहे.