August 4, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

किनवटमध्ये आज 4 बाधितांची भर, आता 20 रुग्ण घेताहेत उपचार , 1 वर्षाची मुलगी निघाली पॉझिटिव्ह.

मजहर शेख

नांदेड / किनवट , दि. ०२ :- किनवटमध्ये आज रविवारी ( ता. दोन) सकाळी साडेदहा वाजता प्राप्त माहिती नुसार आरटीपीसीआर पद्धतीद्वारे केलेल्या तपासणीत 4 अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बाधित रूग्णांची एकूण संख्या वाढून आता 27 झाली आहे. कोरोनामुक्त बरे झाल्याने सुटी होऊन घरी गेलेले आजपर्यंतचे एकूण 7 जण आहेत. बाधितांपैकी संदर्भित 2 व येथील कोविड केअर सेंटरमध्ये 18 असे एकूण 20 रुग्ण उपचार घेत आहेत.
आज राजेंद्रनगर, किनवट येथील 29 वर्षे वयाची एक , 55 वर्षे वयाची एक अशा दोन महिला, एक वर्षाची एक बालिका व लोणी येथील 60 वर्षे वयाची एक महिला असे 4 नवीन रूग्ण आरटीपीसीआर टेस्ट द्वारे केलल्या तपासणीत पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आज सकाळी साडेदहा वाजता आरटीपीसीआर पद्धतीने 60 वर्षीय महिलेचा अहवाल कोविड -19 पॉझिटिव्ह आल्यामुळे उपविभागीय अधिकारी महेश वडदकर यांनी लोणी गाव आता कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केले आहे.
किनवट शहरातील व्ही.आय.पी.रोड, एस.व्ही.एम. कॉलनी, मोमीनपूरा, इस्लामपूरा, राजेंद्रनगर व तालुक्यातील तल्लारी, राजगड तांडा व आता लोणी या कंटेनमेंट झोनच्या विविध कामांची जबाबदारी तहसिलदार उत्तम कागणे, गटविकास अधिकारी सुभाष धनवे, गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने, उप विभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक, पोलिस निरिक्षक मारोती थोरात, सहायक पोलिस निरीक्षक सुशांत किनगे, मुख्याधिकारी निलेश सुंकेवार यांचेवर सोपविली आहे.
डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे 15 ( आरटीपीसीआर 9 + रॅपिड 6 ), कोविड केअर सेंटर, किनवट येथे 3 ( रॅपिड ) व संदर्भित 2 अशा एकूण 20 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. असे वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी कळविले आहे.

किनवट तालुक्याची कोरोना विषयी संक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे
दि. 01/08/2020 सकाळी 10.30 वाजता

घेतलेले एकूण स्वॅब- 191,
निगेटिव्ह स्वॅब- 155,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 4
आतापर्यंतचे एकुण पॉझिटिव्ह व्यक्ती- 27,
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 17
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-1,
मृत्यू संख्या- निरंक,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली एकूण संख्या- 7,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 20,

Advertisements

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!