Home बुलडाणा तीन वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास अटक ,

तीन वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास अटक ,

207

संतापजनक घटना ,

अमीन शाह

बुलडाणा

*नांदुरा* शहरातील – एका तीन वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न झाल्याचा प्रकार आज दिनांक 24 जूनच्या दुपारी साडेतीन वाजे दरम्यान नांदुरा पंचायत समितीच्या मागील भागात अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार घडला दरम्यान यातील नराधमास नागरिकांनी पकडून चोप देत पोलिसांच्या हवाली केले. याबाबत प्राप्त माहितीनुसार स्टेशन रोड परिसरात राहणाऱ्या तीन वर्षीय बालिका अंगणात खेळत असताना 24 वर्षीय युवक राहणार नांदुरा याने सदर बालिकेला कडेवर उचलून नेऊन पंचायत समिती व पशुवैद्यकीय दवाखान्याच्या मागील ओसाड व झाडाझुडपांनी गजबजलेल्या निवांत जागी तिला नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करत होता दरम्यान पंचायत समितीमधील एका कर्मचाऱ्याला मुलीच्या रडण्याचा आवाज आला त्याने दवाखान्यातील कर्मचाऱ्यांसह आवाजाच्या दिशेने घटनास्थळ गाठले तोपर्यंत आरोपीने तिथून पळ काढला होता यावेळी मुलीच्या गळ्याला तिच्यात अंगातील कपड्यांनी गळफास देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले यावेळी काही तरुणांनी त्या नराधमाचा शोध घेऊन त्याला पकडून चोप दिला व पोलिसांच्या स्वाधीन केले सदर बालिकेला नांदुरा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी खामगाव सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले असून त्या युवका वर गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिय सुरू आहे ,