Home नांदेड विवेकानंद (पप्पू ) केळकर यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त 29 जुलै रोजी महारक्तदान शिबीर

विवेकानंद (पप्पू ) केळकर यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त 29 जुलै रोजी महारक्तदान शिबीर

278

नांदेड – कालवश विवेकानंद (पप्पु) केळकर यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून शहरातील युवकांनी शिबिरास मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संयोजक किरण हाटकर यांनी केले आहे.

शहरातील कालवश. विवेकानंद (पप्पु) केळकर यांच्या 12 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त 23 जुलै 2020 रोजी दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी महारक्तदान शिबिराचे पपू केळकर मित्रमंडळाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नांदेड जिल्ह्यात दि. 12 पासून ते 23 जुलै दरम्यान कडक संचारबंदी लागू असल्या कारणामुळे हे रक्तदान शिबिर कार्यक्रम दि 23 जुलै 2020 ऐवजी (29 जुलै 2020 रोजी नांदेड शहरातील श्रीनगर भागातील राठोड कोचिंग क्लासेसच्या खाली, हॉटेल मधुबन समोर, घेण्यात घेणार असल्याचे पप्पू केळकर मित्रमंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
व सध्यास्थितीत कोरोनाचे महाभयंकर संकट लक्षात घेता राज्य आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा भासत आहे, तरी सदरली महारक्तदान शिबरास शहरातील युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन, आपले सामाजिक दायित्व पार पाडण्याचे आवाहन पप्पू केळकर मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
दि. 29 जुलै बुधवार 2020
राठोड कोचिंग क्लासेसच्या खाली, हॉटेल मधुबन समोर, श्रीनगर नांदेड…येथे हे शिबीर होणार आहे .तरी जास्तीत जास्त युवकांनी सहभाग घ्यावा अशे आवाहन संयोजक किरण हाटकर,सुशांत धनेगावकर,सचिन नवघडे, शाबाज खान,दत्ता खराटे, विजय जाधव , विजय टेकाळे, राम वानखेडे, प्रतीक मोरे,अनिकेत भवरे, सुमेध वाठोरे,आनंद हाटकर, सचिन कावडे, संघरत्न थोरात,यांनी केले आहे.रक्तदात्यांनी 8149817358 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन
किरणभाऊ हाटकर यांनी केले आहे.