Home विदर्भ सुट्टीच्या दिवशी निंदायला गेली , तरीही पायल बारावीत प्रथम आली.

सुट्टीच्या दिवशी निंदायला गेली , तरीही पायल बारावीत प्रथम आली.

361

देवानंद जाधव

यवतमाळ – जीवनातील वळना वरच्या वयातील महत्वाचा निकाल म्हणजे बारावी परिक्षेचा निकाल काळजाचे ठोके चुकवुन, काळजाची धडधड वाढविणारा दिवस, डोळ्यात साठऊन ठेवलेल्या त्या दिवसाचा सुर्य ऊगवला. अन पायलची तगमग आणखीच वाढली.

पास होण्याचा आत्मविश्वास होताच पण,मनातील शिक्षणाची योग्य पाऊलवाट निवडण्यासाठी, या शिक्षणाच्या बाजारात टक्का अडसर ठरतो, हे शल्य तिला सारखं बोचत होतं, आई बापांनी पोटाला पालव बांधुन शिकवलं, अगदी दुधाचे ओठ सुकण्यापुर्वी पासुनच ती गावापासुन कोसोदुर बाराखडी आपल्या मेंदुवर बिंबवुन घेत होती, आपल्या कपाळावर लिहीलेलं नशिब टाचेवरच्या भेगांशिवाय पुर्ण होत नाही,हे पायल ला मनोमन माहीत असावं, म्हणुन ति जेव्हा केव्हा यवतमाळ तालुक्यातील रामनगर (बोरी गोसावी ) या आपल्या मायबापाच्या घरी सुटटी च्या दिवसात यायची तेव्हां तेव्हा पायल हातात विळा घेऊन राना शिवारात चिखल तुडवत निंदायला जायची, त्या मेहनतीतुन मिळालेल्या पैस्यातुन आपली शैक्षणिक गरज भागवायची, आपल्या जिवनात विळया अभावी लेखनी असावी, असा ध्यास पायलने उराशी बाळगला, मग तिने कधी मागे वळुन बघीतलेच नाही. कंट्रोलचे गहु तांदुळ खाऊन जीवन जगणार्या मायबापाचा आशिर्वाद संगती घेऊन, ती झपाटल्यागत पुस्तकात डोकं आणि डोळे खुपसून अभ्यास करु लागली. मग कालांतराने पेराल ते ऊगवेल, याची प्रचिती आली, यवतमाळच्या मातोश्री रमाबाई आंबेडकर महाविद्यालयातील तब्बल सत्तर विद्यार्थ्यांमध्ये पायल 88टक्के गुण घेऊन ती कला शाखेतुन प्रथम आली आहे. भूमीहीन आणि हातावर आणुन पानावर खाणार्या मायबापाची लेक शहराच्या शाळेतून पहिली आली ही बातमीच जन्मदात्याच्या अंगावर मुठभर मास चढऊन गेली. गावातील लोकांनी गावभर साखर पेरणी केली. निकालाच्या दिवशी जणु काही गावात दिवाळी साजरी केली गेली. आता माञ पायल वर पडलेल्या जबाबदारीने ती ऊदास झाली. शिक्षण हे एक बाजार आहे. आणि ते खरेदी करण्याची आपल्या मायबापाची ताकत नाही, मग पुढील शिक्षणाचा प्रवास कसा करायचा, या विचाराने पायल आजही तळमळत आहे. तिला अणे महाविद्यालय यवतमाळ येथे प्रवेश घ्यायची ईच्छा असुन सोबतच राज्य सेवा परीक्षेची तयारी करायची आहे. या साठी या विभागाचे ऊभरते नेतृत्व शंकर भाऊ आडे(मुंबई)हे पायलच्या मदतीला धावून आले आहे. लॅपटॉप आणि एम ,पी, एस.सी. परिक्षेच्या नोट्स सह अन्य योग्य ती मदत करणार आहे. बंजारा समाजातील या प्रावीण्य प्राप्त पायलला पुढील शिक्षणासाठी समाजातील दानशुर दानविरांनी मदतीचा हात पुढे केल्यास, भविष्यात पायलच्या रुपाने एक महीला तहसीलदार आकारास येणार आहे. या निमित्ताने पायलची काही इंद्रधनुष्यी स्वप्ने आहेत, त्या स्वप्नांना बिल्लोरी आशेची किनार आहे, त्या स्वप्नांना आकार येऊन ती साकार होवोत हिच सदिच्छा….!