Home बुलडाणा मलकापूर – गोरगरीबांची सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रिद घेवून वाटचाल करणाऱ्या...

मलकापूर – गोरगरीबांची सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रिद घेवून वाटचाल करणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाचा जगावेगळा उपक्रम…!

235

अनिल गोठी – मलकापुर

बुलढाणा – काल शहरातील भिक्षुकी आणि मनोरूग्णांना लॉकडाऊन काळात त्यांची दाढी-कटींग करीत त्यांना नवीन कपडे देवून त्यांच्या जिवनात आनंदाचा क्षण आणण्याचे काम जिल्हाध्यक्ष वैभवराजे मोहिते यांच्या मार्गदर्शनात जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात काल २० जुलै रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाअधिकाऱ्यांनी करण्यात आले.
गेल्या ४ महिन्यापासून सर्वत्र कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन, संचारबंदी लावण्यात आलेली आहे.

अशा प्रसंगी माणुसकीचे दर्शन घडवित प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गोरगरीबांना व गरजवंतांना अन्नदान, धान्य वाटप, कपडे वाटप, रोग प्रतिकार शक्ती वाढविण्याची औषधी वाटप यासह आदी उपक्रम राबविण्यात आले. तर काल शहरातील विविध ठिकाणी असलेल्या व रस्त्यावर फिरणाऱ्या भिक्षुकी व मनोरूग्णांची दाढी, कटींग करण्यात आली तसेच त्यांना स्वच्छ आंघोळ घालून त्यांना नवीन कपड्यांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे त्या मनोरूग्ण व भिक्षुकींच्या चेहऱ्यावर हास्य तथा आनंद दिसून येत होता.
यावेळी तालुका प्रमुख अजीत पुंâदे, शालीकराम पाटील, अमोल बावस्कर, सौरभ तायडे, सागर ठाकरे, निलेश चोपडे, रामेश्वर तायडे, शितल जांगडे, संजय इंगळे, वाहतूक पोलिस कर्मचारी महेश चोपडे यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.