Home जळगाव त्या मृत्यू झालेल्या अल्पवयीन मुलीच्याच्या धार्मिक विधीसाठी मानियार बिरादरी ने केली आर्थिक...

त्या मृत्यू झालेल्या अल्पवयीन मुलीच्याच्या धार्मिक विधीसाठी मानियार बिरादरी ने केली आर्थिक मदत

202

रावेर (शरीफ शेख)

जळगाव – तांबापुर येथील अल्पवयीन मुलगी जी कामाच्या ठिकाणावरून बेपत्ता झाली होती व दुसऱ्या दिवशी तिचे प्रेत मेहरूण तलावात आढळून आले होते त्या मुलीचे अंत्यसंस्कार मुस्लिम इदगाह कबरस्तान येथे सोमवारी रात्री करण्यात आले.

मंगळवारी तिचे इतर धार्मिक विधी व त्याच्या कुटुंबियांना उदरनिर्वाहासाठी जळगाव जिल्हा मन्यार बिरादरी ने तांबापुर येथे त्याच्या निवस्थानि जाऊन चौकशी करून त्यांच्या बिरादरीचे प्रमुख हनिफ शाह बापू यांना भेटून त्यांच्या शुभहस्ते त्या मुलीच्या आईला ५१०० रु आर्थिक सहाय्य रुपये रोख दिले जेणेकरून त्या मयत मुलीचे धार्मिक विधी पार पाडण्यास त्यांना मदत होईल तसेच तिची आई ही पंधरा-वीस दिवस कामावर जाणार नसल्यामुळे कुटुंबाचे उदरनिर्वाहा साठी हाल-अपेष्टा होऊ नये म्हणून बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी सदर आर्थिक सहाय्य केलेले आहे .
यावेळी युवा मानियार बिरादरीचे मोहसिन युसुफ, मन्यार वाड्यातील सिकलिगर जमातीचे मुजाहिद खान, तांबापुर येथील शहा बिरादरीचे आसिफ शाह,मुख्तार शाह, एजाज शाह, सह मृता चे मामा अझीम शाह,मावसा जावेद शाह,मावशी शमीम शाह, तांबापूर येथील इस्माइल खान व फारूक फलक यांची उपस्थिती होती.
मयत मुलीची आई श्रीमती सुफीया बी यांना फारुक शेख यांनी आपली बहीण मानून भविष्यातील अडचणीमध्ये सुद्धा आम्ही आपल्या पाठीशी आहोत असे आश्वासन दिले.
मनीयार बिरदारीच्या कार्याचे व फारूक शेख यांनी सुफीया बी ला बहीण मानल्या बद्दल हानिफ शाह बापू यांनी मन्यार बिरादरी ला आशीर्वाद (दुवा) दिली व या कठीण प्रसंगी आपण या शाह बिरदारीच्या कुटुंबासोबत उभे राहिलात त्याबद्दल बिरादरी चे आभार सुद्धा व्यक्त केले.