Home बुलडाणा रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा आणि कृषि विज्ञान केंद्राचा आधुनिक उपक्रम

रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा आणि कृषि विज्ञान केंद्राचा आधुनिक उपक्रम

213

डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने मल्टी लोकेशन कॉन्फरन्स च्या माध्यमातून शास्त्रज्ञांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

प्रतिनिधी:-रवि आण्णा जाधव
देऊळगाव मही :- ०९ जुलै – रिलायन्स फाउंडेशन आणि कृषि विज्ञान केंद्र ,बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकर्‍यांना योग्य मार्गदर्शन मिळण्याकरिता मल्टी लोकेशन ऑडिओ कॉन्फरन्स कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येत्या काळामध्ये शेती करताना काळजी कशी घ्यावी, काय उपाययोजना कराव्यात तसेच विविध पिकांवरील कीड रोग व्यवस्थापन शेती मधील विविध समस्या, खताचे व्यवस्थापन, आणि तण व्यवस्थापन, हवामानाचा अंदाज याविषयी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास कृषि विज्ञान केंद्र बुलढाणा चे डॉ.चंद्रकांत जायभाये , (प्रमुख कृषि विज्ञान केंद्र बुलढाणा) आणि डॉ. श्री जगदीश वाडकर (विषय विशेषज्ञ) यांनी मार्गदर्शन केले. त्यास शेतकरी बांधवानी आपल्या शेतीपिक समस्या विचारून निराकरण करून तज्ज्ञांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळावे यासाठी बुलढाणा जिल्ह्यामध्ये रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा बुलढाणा यांच्या वतीने डिजिटल टेक्नॉलॉजि चा वापर करून डायल आऊट कॉन्फरन्स चे आयोजन करण्यात आले होते. रिलायन्स फाउंडेशनच्या विविध कार्यक्रमांपैकी डायल आऊट काँफेरेन्स हा एक कार्यक्रम आहे.
कार्यक्रमामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून शेतकरी सहभागी झाले होते. अनेक शेतकर्‍यांनी कार्यक्रमात सहभागी होऊन आपले प्रश्न विचारले व त्यावर तज्ञांनी सोप्या शब्दात त्यांचे निरसरन केले. कार्यक्रमाचे आयोजन रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक शुभम लाखकर यांनी केले. कार्यक्रच्या यशस्वीतेसाठी श्री गणेश वायाळ यांनी अथक परिश्रम घेतले.
शेतकर्‍यांनी अधिक माहिती करिता रिलायन्स फाउंडेशनच्या टोल फ्री क्रमांक 1800 419 8800 यावर कॉल करावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्री शुभम लाखकर यांनी केले.