Home नांदेड जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी व पालकांचा खासदार हेमंत पाटील...

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी व पालकांचा खासदार हेमंत पाटील यांनी अभिंनदनपर प्रशस्तिपत्र देउन केला सत्कार

144

मजहर शेख

नांदेड / किनवट , दि. १२ :- जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल खासदार हेमंत पाटील यांचे अभिंनदनपर प्रशस्तिपत्र देउन तालुक्यातील सहा विद्यार्थी व पालकांचा शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी पाटील मुरकुटे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
रविवारी (दि. १२ ) गोकुंदा येथील तालुकाप्रमुखांचे कार्यालयात जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रवेशास पात्र ठरलेल्या किनवट तालुक्यातील विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवून उज्ज्वल भवितव्यासाठी प्रेरणा देण्याच्या उद्देशाने हिंगोली लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार हेमंत पाटील यांचे अभिंनदनपर प्रशस्तिपत्र व शाल, श्रीफळ देउन शिवसेना तालुका प्रमुख बालाजी मुरकुटे यांचे हस्ते विद्यार्थी व पालकांचा सत्कार करण्यात आला.
यशवंत विद्यार्थी : अमेय अनिलकुमार येरेकार, अथर्व धोंडबा भुरके ( सेंट मेरी’स इंग्लिश स्कूल, गोकुंदा), ओमश्री बळीराम मुंडे ( महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक शाळा, गोकुंदा ), तेजस लक्ष्मण पांडागळे, धनंजय अरूण पळसपुरे (जि.प.हा. इस्लापूर ), साई संतोष सातलवाड (स.वि. मं.प्रा.शा. बोधडी बु.)
यावेळी शहरप्रमुख सुरज सातुरवार, संतोष एलचलवार, खासदारांचे जनसंपर्क अधिकारी सुनिल गरड पाटील, कपील रेड्डी, अॅड.सुनिल येरेकार, रमेश आंधळे, सुनिल गित्ते, अतुल दर्शनवाड, पत्रकार दत्ता जायभाये, तोलाराम मुंडे,अनिल येरेकर, धोंडीबा भुरके, बळीराम मुंडे, संतोष जाधव आदिंची उपस्थिती होती. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

शालेय जीवनातील स्पर्धा परिक्षेची पूर्वतयारी असलेली जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा आहे. अतिदूर्गम, डोंगरी, आदिवासी किनवट तालूक्यातून विद्यार्थ्यांनी प्रज्ञा, प्रतिभेचा अविष्कार फुलवून हे दैदिप्यमान यश संपादन केले याचा आम्हास अभिमान वाटतो. यशवंतांना उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा !

हेमंत पाटील
खासदार , हिंगोली