Home बुलडाणा पोलीस बांधवामध्येच पांडुरंग दिसला ऊर्मिलाताईं ठाकरे

पोलीस बांधवामध्येच पांडुरंग दिसला ऊर्मिलाताईं ठाकरे

31
0

अमीन शाह

*खामगाव-* *सुरवातीला खामगाव* *येथील साहित्यिका,समाजसेविक* *तथा शिक्षणतज्ञ वनश्री ऊर्मिलाताई* *ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने*
*दि. ४ जुलै 2020 रोजी खामगाव येथे पोलीस अधिकारी व कर्मचारी या २५० कोरोना योद्धयांना ठाणेदार श्री.सुनिल अंबुलकर व ऊर्मिलाताईंच्या शुभहस्ते फेस शिल्ड वाटप करण्यात आले.*

*कोव्हिड-१९ या साथीच्या काळात कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी व आपण सर्वजण कोरोना या रोगापासून सुरक्षित राहावे यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी हे आपल्या जिवाची पर्वा न करता अथक परिश्रम घेत आहेत या पोलीस बांधवांमध्येच मला पांडुरंग दिसला*
*आणि म्हणूनच आम्ही पोलीस*
*बांधवास स्वतःचे संरक्षणार्थ फेस शिल्ड देण्याचा अट्टाहास केला आणि तो यशस्वी पण झाला.असे*
*वनश्री ऊर्मिलाताई ठाकरे यांचे* *वाढदिवस निमित्ताने फेस शिल्ड वाटप प्रसंगी त्या बोलत होत्या.*

*पुढे मनोगत व्यक्त करतांना* *ठाणेदार म्हणाले की,ऊर्मिलाताईंनी* *सामाजिक बांधिलकी जोपासली असून राष्ट्रहीत जोपासले आहे.*
*या फेस शिल्ड मुळे आम्हा* *पोलीसांना आमचे संरक्षण*
*करण्यास निश्चितच मदत होईल.*

*या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या* *यशस्वीतेसाठी संजीवनी मल्टीपर्पज एज्युकेशन वुमेन्स अकॅडमी महाराष्ट्र राज्य अध्यक्षा सौ.रश्मीताई वानरे तसेच प्राचार्य.डाॅ. जानकीरामजी देव्हडे,श्री.प्रा.श्री.गजाननजी पदमने, श्री.प्रकाश टिकार,प्रोफेसर डाॅ.श्री.भूषण ठाकरे,प्रा.सौ.लक्ष्मी ठाकरे, सौ.निकीता सराफ, श्री.नारायण सोनोने,राहुल आडेकर यांनी परिश्रम घेतले.*

Unlimited Reseller Hosting