Home बुलडाणा नियमाचे पालन करा,कोरोनाला दूर सारा…. पोलीस प्रशासन व ग्राम पंचायतच्या संयुक्त विद्यमनाने...

नियमाचे पालन करा,कोरोनाला दूर सारा…. पोलीस प्रशासन व ग्राम पंचायतच्या संयुक्त विद्यमनाने डोणगांव मध्ये कार्यवाही १५८ लोकांवर झाली दंडात्मक कार्यवाही.

195

जमीर शाह

डोणगांव
मेहकर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला मात्र ह्या कोरोनाचा प्रादुर्भाव वेळीच रोखला पाहिजे यासाठी मेहकर उपविभागीय अधिकारी गणेश राठोड यांनी मेहकर उपविभागात मेडिकल ,दवाखाने आणि कृषी सेवाकेंद्र या व्यतिरिक्त इतर दुकान यांचा वेळ सुद्धा ९ ते ३ परियानंत केला व डबलसीट आणि तिबालसीट हुंदडणाऱ्या मोटारसायकलवर कार्यवाही करण्या संदर्भात निर्णय घेतला त्याची कडक अंमलबजावणी ४ जुलै रोजी डोणगांव मध्ये पाहायला मिळाली.
डोणगांव हा बुलढाणा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आहे सध्या येथे कोरोनाचा शिरकाव नाही जेही कोरोना बाधित होते ते बाहेरून आलेले होते तेव्हा कोरोनाचा शिरकाव होऊनये या साठी पोलीस प्रशासन व ग्राम पंचायत प्रशासन आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत या पूर्वी ग्राम पंचायतीने येथील दुकांदारावर वेळेत आपली दुकाने बंद न केल्याने कार्यवाही केली होती त्याने दुकाने वेळेत बंद होण्यास सुरुवात झाली मात्र डबलसीट व तिबलसीट मोटारसायकलवर हुंदडणारे,विना मास्क लावून फिरणारे मात्र मोकाट फिरत होते तेव्हा ठाणेदार दीपक पवार यांनी ग्राम विकास अधिकारी यांच्याशी चर्चा करून पोलीस प्रशासन व ग्राम पंचायत प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमनाने ४ जुलै रोजी कार्यवाही केली. विना मास्क लावून फिरणारे,मोटारसायकलवर डबलसीट व तिबालसीट फिरणारे अश्या १५८ लोकांवर कार्यवाही केली त्यांच्या कडून २०० रुपये प्रमाणे दंड वसूल करण्यात आला तर ठाणेदार यांनी प्रत्येक दुकानावर जाऊन दुकानदारांना मास्क वापरा,सोशल डिस्टन्स पाळा, विना मास्क लावलेल्या ग्राहकाला कोणताच माल देऊ नका अश्या सूचना वजा इशारा देऊन दुकानदारांना कोरोनाचे गांभीर्य काळवून दिले.
आम्ही पोलीस अधीक्षक डॉ दिलीप भुजबळ यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय महसूल अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या सूचना नुसार काम करत कोरोना डोणगांव परिसरा पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहोत याचाच एक भाग म्हणजे ४ जुलै रोजी ग्राम पंचायत व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमनाने ही कार्यवाही केली आणि अशीच कार्यवाही ही पुढे सुद्धा सुरू राहणार.
ठाणेदार दीपक पवार डोणगांव.