Home बुलडाणा साखरखेर्डा येथील दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह .. शहरात उडाली खळबळ ,

साखरखेर्डा येथील दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह .. शहरात उडाली खळबळ ,

202

अमीन शाह

सिंदखेडराजा:- लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथील एक महिला काल दि. २५ जून रोजी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये तालुक्यातील साखरखेर्डा येथील दोन व्यक्तींना दि. २६ जून, शुक्रवारी तपासणीसाठी बुलडाणा येथे रवाना करण्यात आले होते.*
*लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे तपासणी अहवालात २५ जून रोजी निष्पन्न झाले. जिल्हा रुग्णालयात ह्या महिलेची कॉन्टॅक्ट ट्रेसिंग घेतली असता त्यात ही महिला साखरखेर्डा येथे वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे माहेरी येऊन गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सुरुशे तसेच ठाणेदार संग्राम पाटील यांना यासंदर्भात कळविण्यात आले. त्यावरुन त्या महिलेच्या साखरखेर्डा येथील माहेरच्या कुटुंबातील दोन व्यक्तींना तपासणीसाठी बुलडाणा येथे रवाना करण्यात आले होते. दोघांचाही स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त नुकतेच हाती आले आहे.*
*काळजी घ्या ..*
*सुरक्षित राहा …*🙏