Home जळगाव बागवान मोहल्ला मध्ये ५६६४ लोकांचे सर्वेक्षण तर ९४४ लोकांची वैद्यकीय तपासणी

बागवान मोहल्ला मध्ये ५६६४ लोकांचे सर्वेक्षण तर ९४४ लोकांची वैद्यकीय तपासणी

38
0

सोमवारी मासुमवाडी व कासमवाडी मध्ये होणार तपासणी

रावेर (शरीफ शेख)

जळगाव कोविड केअर युनिट तर्फे सुरू असलेल्या सर्वेक्षण व वैद्यकीय शिबिराचा १० वा दिवस बागवान मोहल्ला,मानियार मोहल्ला व इस्लाम पुरा येथील ५६६४ लोकांची तपासणी थर्मल ऑक्सिमीटर व फींगरऑक्सी मीटर ने करण्यात आली.

त्या पैकी ९४४ लोकांची त्यात १७४ लहान मूल व मुली चा समावेश होता वैद्यकीय तपासणी करून मोफत औशोधोपचार करण्यात आला.
त्यापैकी एकच संशयास्पद रुग्ण आढळून आल्याने त्यांची रवानगी जळगाव येथील खाजगी रुग्णालयात करण्यात आली.

*उद्घाटन समारंभ*.

या वैद्यकीय शिबिराचे उद्घाटन सगीर बागवान व गुलाब बागवान यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी व्यासपीठावर मानियार बिरदारीचे सैयद चाँद,जे सी सी यु चे फारूक शेख, समन्वयक डॉक्टर जावेद शेख,नगरसेवक रियाझ बागवान, समाज वादीचे रईस बागवान,भा ज प चे इंद्रिस बागवान, शिवसेनेचे माजी नगर सेवक खालिद बागवान ,ईदगाह चे इक्बाल सगीर सिकलगर बिरदारीचे अन्वर सिकलगर, अनिस बागवान यांची उपस्थिती होती.

*बागवान मोहल्ला मध्ये कार्यरत योद्धा डॉक्टर*

डॉ. शरीफ शाह साहब,डॉ. जावेद सईद शेख.डॉ.रियाज़ बागबान,डॉ. ज़ाकिर खान,डॉ. साबिर मंसूरी, डॉ. अमजद खान, डॉ. वसी अहमद, डॉ. जावेद खान, डॉ. रऊफ बागबान, डॉ.आसिम खान, डॉ. अलीम बागबान, डॉ. एजाज़, डॉ.वहाब शेख, डॉ.निशात वहाब शेख, डॉ.साइमा शेख

*यांनी केले परिश्रम*
अनिस शाह, आमिर शेख,अकील शेख ,फैझान शेख,अझीझ सिकलगर,हाजी शेख युसूफ,मुजाहिद शेख,शाहिद शफी,अझहर हुसेन,हाफिज इब्राहिम,तय्यब शेख,तौसिफ सैयद, रफिक शफी,मोहम्मद अली बागवान,दानिश बागवान यांनी नोंदणी,सर्वेक्षण व औषधी वाटप केले.
तर यशस्वीतेसाठी शिबान बागवान,रऊफ शेख,सलीम सैयद,साबीर सैयद,आबिद हारून, जुलकर नैन, मोहसीन शेख,आरिफ देशमुख,मेहमूद खान,नईम बशीर,तलहा शेख, परवेज शेख यांनी परिश्रम घेतले

*आयोजन व नियोजन संपूर्ण पणे खर्च सगीर सेठ यांनी तर औशोधोपचारा चा खर्च गुलाब बागवान यांनी केला*

कार्यक्रमाची सुरुवात मौलाना नइम यांच्या कुराण पठणाने झाली.
गुलाब बागवान,नदीम मलिक,रईस बागवान,इंद्रिस बागवान यांनी मार्गदर्शन केले प्रास्ताविक फारूक शेख यांनी सादर केले,सूत्र ताहेर शेख तर आभार सैयद चाँद यांनी मानले.

सोमवारी मासुम वाडी येथे कॅम्प ठेवण्यात आले असून त्यात ,कासम वाडी,सैयद असरार नगर, रचना कॉलोनी,वर्षा कॉलोनी,सम्राट कॉलोनी,सालार नगर मधील लोकांनी तपासणी करून घ्यावी असे आव्हान मुफ्ती अतिक, गफ्फार मलिक,डॉ जावेद,फारूक शेख,अझीझ सिकलगर,कुददुस शेख,डॉ अमनुल्लाह शाह,व आकीब सैयद, यांनी एका पत्रका द्वारे केले आहे.

Unlimited Reseller Hosting