August 5, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

सामान्य जेनतेला फिटनेस प्रमाण पत्र निशुल्क द्या;युवासेना उपजिल्हाप्रमुख संभाजी शिंगणे यांची मागणी…!

रवी जाधव
देऊळगाव मही/(प्रतिनिधी):- दि.२४ जून रोजी युवा सेना उपजिल्हाप्रमुख संभाजी शिंगणे यांच्या वतीने ग्रामीण रुग्णालय येथे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, आज देश भर कोराना आजाराच्या ह्या संकटामुळे सामान्य नागरिक अडचणीत सापडला आहे.
हाताला काम नसल्याने घरात उपासमारी ची वेळ आली असतांना उदनिर्वाह करणे, पोटाची खळगी भरणे कठीण झाले आहे.
अश्या परिस्तिथी आज रोजी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतर करणाऱ्या मजुरांना व अत्यन्त महत्वाच्या कामानिमित्त सर्व सामान्य जनतेला जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी जी परवानगी आवश्यक असते त्या परवानगी साठी लागणारे मेडिकल ,फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक असते त्यासाठी ग्रामीण रुग्णालयात फिस आकारणी सुरू आहे.
परन्तु सामान्य जनतेचे खायाचे वांधे झाल्याने त्यांना ही फीस देणे अश्यक्य होत आहे.
त्यामुळे जो कोणी व्यक्ती फिटनेस प्रमाणपत्र घेण्यासाठी आपल्याकडे येईल त्या व्यक्ती कडून आपण कोणतेही शुल्क आकारून नये अथवा सामान्य जनते कडून कोणती ही फीस अथवा पैसे घेऊ नये अशी सूचना देण्यात आली आहे.
सदर निवेदनावर संभाजी शिंगणे(युवासेना उपजिल्हाप्रमुख),संपादक आदील पठाण,अमोल वायाळ,गणेश पंडित, उमेश शिंगणे,उमेश इंगळे, यासह इतर सदस्य उपस्थित होते.

Advertisements

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!