Home बुलडाणा बोलेरो पिकप व मोटर सायकलच्या अपघातात दोन ठार तर दोन गंभीर जखमी…!

बोलेरो पिकप व मोटर सायकलच्या अपघातात दोन ठार तर दोन गंभीर जखमी…!

138

जानेफळ – मेहकर मार्गावरील घटना…!!

सय्यद महेबूब

जानेफळ – बोलेरो पिकअप व मोटरसायकल दरम्यान जोरदार अपघात होऊन यात दोन जण जागीच ठार झाले आहेत तर दोघांना गंभीर जख्मी अवस्थेत मेहकर येथे हलविण्यात आल्याची घटना आज शुक्रवार दि. १२ जून २०२० रोजी सायंकाळी ७ वाजे दरम्यान जानेफळ मेहकर मार्गावर जानेफळ येथे जिजामाता नगर जवळ घडली आहे.
याबाबत सविस्तर असे की मोसंबे वाडी तालुका मेहकर येथील ओम् गजानन मोसंबे, अक्षय गजानन भाकडे, नागेश गजानन मोसंबे व अधिक एक असे चौघेजण होंडा शाहीन मोटरसायकल क्रमांक एम.एच.२० ई झेड २९०४ वरून मोसंबे वाडी तालुका मेहकर येथून जानेफळ कडे येत होते तर बोलेरो पिक अप क्रमांक एम.एच. २८ बी बी ०५६० ही गाडी फोटो फ्रेमिंगचे साहित्य घेऊन शेगाव वरुन मेहकर येथे जात होती तेव्हा भरधाव वेगात असलेल्या या दोन वाहनांमध्ये भीषण अपघात झाल्याने यात ओम गजानन मोसंबे व अक्षय गजानन भाकडे हे दोघे जागीच ठार झाले आहेत तर नागेश गजानन मोसंबे व अधिक एक अशा दोघांना गंभीर जखमी अवस्थेत मेहकर येथे हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती समजताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी दोघांना खाजगी वाहनातून मेहकर येथे रवाना केले आहे.पोलिसांना या घटनेची माहिती समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करीत प्रेत शवविच्छेदनासाठी मेहकरला हलविले आहे. वृत्त लिहीपर्यंत पोलिसात गुन्हा दाखल झालेला नव्हता.सदर अपघातानंतर बोलेरो पिकअप गाडी चालक अनिल सुरेश सोनुने रा.शेगाव याने आपले वाहन थेट पोलीस स्टेशनला आणून पोलिसांना अपघाताची माहिती दिली व अटक करून घेतले.
नवीनच झालेल्या पालखी मार्गाच्या रस्त्यावर वाहनांच्या सुसाट वेगामुळे जानेफळ परीसरात सारख्या छोट्या-मोठ्या अपघातांच्या घटना सुरूच असून आजच्या या भीषण अपघातामुळे मात्र जानेफळ परिसर हादरून गेले आहे.