Home कृषि व बाजार गौळ येथे सोयाबीन बियाणांची उगवण क्षमता तपासण्याचे प्रात्यक्षिक.!

गौळ येथे सोयाबीन बियाणांची उगवण क्षमता तपासण्याचे प्रात्यक्षिक.!

48
0

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा – जिल्ह्यात खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांकडील उपलब्द्ध सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता तपासणी कशी करायची याची प्रात्यक्षिक करून दाखविण्या करीता तालुका कृषी विभागाचे वतीने जनजागृती करण्यात येत असून गौळ येथे याबाबत शेतकरी वर्गाला तालुका कृषी विभागाच्या वतीने प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.
दरवर्षी सोयाबीन पेरणीच्या बियाणांच्या किमंतीमध्ये भाव वाढ होत असल्याने शेतकरी यांना हे बीयाणे परवडणारे नसतानाही शेतकर्याना विकत घ्यावी लागतात. त्यामुळे शेतकर्याचे आर्थिक बजेट कोसळल्या जाते.
पेरणी करीता सोयाबीन बीयाणे जर शेतकर्याने घरचेच पेरले तर फार मोठा खर्च वाचल्या जाणार असल्याने घरीच जर शेतकरी बीयाणे तयार करू शकला तर अनेक शेतकरी बीयाणे घेण्यासाठी येवून छोटी बाजार पेठ उपलब्ध होवून शेतकरी यांना आर्थीक लाभ होवून विश्वासाचे बीयाणे तयार होणार असल्याचे कृषी सहाय्यक सुभाष राठोड यांनी शेतकर्याना मार्गदर्शन करतांना सागितले. यावेळी उपस्थित शेतकरी यांच्या समोर सोयाबीन बियाणांची उगवण क्षमता कसी तपासायची याचे शेतकर्याना प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.
तालुका कृषी अधिकारी अश्विनी कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषि अधिकारी अतुल वायसे आणि कृषि सहाय्यक सुभाष राठोड व श्री बुधवंत यांनी शेतकर्याना मार्गदर्शन केले. यावेळी उपसरपंच मनोज नागपूरे,शेतकरी योगेश कांबळे , ज्ञानेश्वर नागपूरे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

Unlimited Reseller Hosting