Home जळगाव अमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शाहीद सय्यद (मेम्बर) यांच्या वाढदिवसानिमित्त फेस मास्क व...

अमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शाहीद सय्यद (मेम्बर) यांच्या वाढदिवसानिमित्त फेस मास्क व सॅनिटाईजर चे वाटप

220

रावेर (शरीफ शेख)

अमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शाहीद सय्यद (मेम्बर) यांच्या वाढदिवसानिमित्त
शनी पेठ पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक श्री ससे साहेब व इतर कर्मचारी वर्गाला तसेच विद्युत विभागातील कर्मचारी वर्ग यांना फेस मास्क व सॅनिटाईजर चे वाटप करण्यात आले.
या वेळी श्री ससे साहेब यांनी शाहिद सय्यद यांचा सत्कार केला व वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा केल्याबद्दल शुभेच्छा पण दिल्या.
कोरोना काळात लॉकडाऊन आहे अशा वेळेस पोलीस विभाग ,विद्युत विभाग आपले कर्तव्य बजावत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून फेस मास्क व सॅनिटाईजर वाटप उपक्रम राबविण्यात आला.
या प्रसंगी फारूक क़ादरी, निसार खान, शाहिद नासिर खान, साहिल साजीद सय्यद, हुजीफा कादरी, अहेताशाम शेख, ई बांधव उपस्थित होते..