Home मराठवाडा महान तपस्वी , महंत चंद्रशेखर भारती-गिरी महाराज यांचे कोण आहे उत्तराधिकारी ?...

महान तपस्वी , महंत चंद्रशेखर भारती-गिरी महाराज यांचे कोण आहे उत्तराधिकारी ? …जाणून घ्या..!

106

लक्ष्मण बिलोरे – घनसावंगी

जालना – महान तपस्वी , महंत चंद्रशेखर भारती-गिरी महाराज यांचे भादली येथे नुकतेच देहावसान झाले. अनुष्ठाण , कठोर तपश्चर्या आणि योगशक्तीच्या आधारे भारती बाबांना दीर्घायुष्य प्राप्त झाले. २९ मे २०२० रोजी १२८ व्या वर्षी गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या श्रीक्षेत्र भादली येथे बाबाजींचे पट्टशिष्य गजानन गुजर यांच्या निवासस्थानी बाबाजींनी देह सोडला.दिवंगत महंत चंद्रशेखर भारती-गिरी महाराज यांचे अनेक चमत्कारिक किस्से आहेत. बाबाजींना अगोदरच धोक्याची चाहूल लागत असे म्हणून आपल्या सहवासात असलेल्या भक्तांना सूचना देत असत , काय करावे काय करू नये हे सांगायचे , हिंदू धर्म प्रचारक , मंदिर सेवक म्हणून त्यांचे कार्य राहिले, जुनागड गिरनार पर्वतावर एका पायावर उभं राहून नऊ वर्षे तपश्चर्या केली असल्याचे सांगितले जाते , जंगलातील प्राणी त्यांचा आवाज ऐकून जवळ येत , सांगितले जात आहे किती,बाबाजींचा एक लाडका कोल्हा पण होता , निरंजनी आखाडा, उक्कडगाव संस्थानचे मठाधिपती महंत डॉ दिगंबर श्रीकृष्ण पुरी महाराज,राजाटाकळी येथील तुळजाभवानी संस्थानचे महंत गणेशानंद महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत ,संतमहात्म्यांच्या सानिध्यात जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील श्रीक्षेत्र भादली या सदानंद महाराज यांच्या पावणभुमीत महंत चंद्रशेखर भारती-गिरी महाराज यांचे उत्तराधिकारी म्हणून बाबाजींची अहोरात्र सेवेत असलेले भक्त धनंजय गुजर यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने संपूर्ण देशभरात लाॅकडाउन जाहीर करण्यात आलेले आहे.शासनाच्या आदेशाचे पालन व्हावे तसेच सुरक्षीततेचा भाग म्हणून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत १३ जून २०२० रोजी छोटेखानी कार्यक्रम होणार आहे.कोणीही आपले घर सोडू नये,घरातच सुरक्षित राहा, असे आवाहन गजानन गुजर यांनी केले आहे.