
वागदरी / नागप्पा आष्टगी
अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील प्रा आरोग्य केंद्रातील कर्मचा-यांना जि प सोलापूर यांच्याकडून कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी पी पी ई किट, मास्क साईनिटायजर, गन आदी साहित्याची वाटप जि प सदस्य आनंद तानवडे यांच्या हस्ते देण्यात आला.
अक्कलकोट तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव झाल्यामुळे वैद्यकिय कर्मचारी धास्तावले आहे. कोरोना विषाणूचा मुकाबला करताना वैद्यकिय कर्मचा-यांना पी पी ई किट, मास्क साईनिटायजर महत्वाचे आहे. त्यामुळे जि प सोलापूर यांच्याकडून उशिरा का होईना वाटप करण्यात आले. या वेळी वैद्यकिय अधिकारी डॉ. काबंळे, डॉ. साधना पाटील, डॉ मरकडकर, माजी जि प सदस्य विजयकुमार ढोपरे, ग्यानप्पा बटगेरी, गोगांव, खैराट, किरनळ्ळी, घोळसगांव, भुरीकवठे, काझिकणमस येथील आरोग्य सेविका, आरोग्य सेवक व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी बोलताना वैद्यकिय अधिकारी डॉ काबंळे म्हणाले की, कोराना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी वागदरी प्रा आरोग्य केंद्र सज्ज आहे. त्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण आहे. वागदरी प्रा आरोग्य केद्र ़अंतर्गत येणा-या सर्व गावातील नागरिकांचे थर्मल स्क्रिनिंगचे काम पर्ण झाले आहे. काही लक्षणे आढळुन आल्यास त्वरित उपचार करण्यात येत आहे.
नागरिकांनी कोरोनाला घाबरू नका, मात्र काळजी घेतल्यास या महामारीपासुन नक्कीच सुटका मिळवु शकतो. अक्कलकोट ग्रामीण भागात कोरोना रूग्ण आढळल्यास आता सोलापूरला हलविण्याची गरज नाही. अक्कलकोट येथे उपचार करण्याची व्यवस्था आहे. नागरिकांनी घराबाहेर विनाकरण पडू नका, सोशल डिस्टन्सिंग ठेवा, मास्क वापरा, आनलाइन व्यवहार करा.
आनंद तानवडे जि प सदस्य वागदरी











































