बुलडाणा

अहमद रजा ग्रुपच्या वतीने किराणा सामान व सुख्या मेव्याचे चे वितरण

Advertisements
Advertisements

सय्यद तौसिफ

सिंदखेडराजा

: सिंदखेड राजा तालुका अंतर्गत दुसरबीड येथील समाजसेवेची जाण असलेल्या अहमद रजा ग्रुपचा तरुणांनी कोरोणा संसर्ग रोगामुळे लॉक डाऊन काळात रोजगार गमावलेले मजूर, विधवा,परित्यक्त्या महिला, अपंग व निराधार लोकांना सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या ग्रुपच्या वतीने आपले काहीतरी योगदान असले पाहिजे. या हेतूने प्रेरित होऊन गरीब गरजू व निराधार लोकांना किराणा सामान आणि सुख्या मेव्याचे चाळीस किट चे वितरण केले.
सदर किट मध्ये तेल, साखर , चहा पत्ती, मसाले ,हळद , बिस्किट , या सह स्वयंपाक घरात लागणार्‍या आवश्यक वस्तूंचा समावेश होता. तसेच खोबरे, खारीक, बदाम, काजू ,मनुके या सुखा मेव्या चाही समावेश करण्यात आला होता.
अत्यंत गरीब आणि गरजू लोकांनाच ह्या कीड चे वाटप करण्यात आले हे विशेष.
खऱ्या गरजू आणि अडचणीत सापडलेल्यानां हे दान करण्यात आल्यामुळे अहमद रजा ग्रुप च्या तरुणांचे कौतुक होत आहे.
*अहमद रजा ग्रुपच्या दातृत्वा ला सलाम*
*सर्वसामान्यांची जाण असलेला ग्रुप*
*सर्वसामान्य आणि अडचणीत सापडलेल्या लोकांची मदत केल्याने विशेष समाधान मिळते असे या ग्रुपच्या सदस्यांनी बोलून दाखविले*
*विशेष म्हणजे या ग्रुप चा कोणताच सदस्य कमवता नाही. 18 ते 20 वयोगटातील हे सर्व तरुण आहेत. आपल्या पॉकेटमनी मधून वाचवलेल्या पैशांमधून या तरुणांनी गरजू लोकांची मदत केली हे विशेष*

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

बुलडाणा

पालकमंत्री महोदय यांच्या बद्दल सोशल मीडिया वर अपशब्द वापरणाऱ्या वर कार्यवाही ,

  साखरखेर्डा पोलिसांची कामगिरी , गोपाल रामसिंग शिराळे , साखरखेर्डा प्रतिनिधी , गेल्या काही दिवसा ...
बुलडाणा

बोर्डी नदीच्या पुराच्या पाण्यात तिघे गेले वाहून बाप लेकाचा समावेश , “दुःखद घटना” अमीन शाह

अमीन शाह बुलडाणा – खामगाव तालुक्यातील माक्ता येथील दिलीप नामदेव कळसकार 38 ,गजानन लहानु रणसिंगे ...
बुलडाणा

पुरात अडकलेल्याना वाचविण्यासाठी गेलेला युवकाचा दुर्देवी मृत्यू 

कोराडी प्रकल्प वर ची घटना…! अमीन शाह बुलडाणा – मेहकर तालुक्यातील कोरोडी प्रकल्पाच्या सांडव्यात पोहण्यासाठी ...