Home रायगड पत्रकार असल्याचे सांगून महिलेला धमकी व शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलीसांत गुन्हा दाखल…!

पत्रकार असल्याचे सांगून महिलेला धमकी व शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलीसांत गुन्हा दाखल…!

61
0

कर्जत – पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे.अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी पत्रकारांची भुमिका ही महत्त्वपूर्ण ठरत आहे त्यासाठी पत्रकाराने निस्वार्थी, निःपक्ष काम केले पाहिजे शासन व जनता यातील दुवा म्हणून पत्रकार आपली भुमिका पार पाडत असतात अशाच पत्रकारांना समाजात मानाचे स्थान आहे.
ज्यांना चार ओळींच्या बातम्या लिहिता येत नाही,पत्रकारितेचे पुरेसे ज्ञान नाही अर्ध वय निघून गेलेले असते.बाहेरील विदर्भातील पत्रकरांच्या संघटना कर्जतमध्ये आणून पत्रकार असल्याचे ओळखपत्र बनवून आपण पत्रकार असल्याचे भासवून कर्जत तालुक्यातील गुंडगे गावातील एका महिलेला मोबाईल द्धारे फोन करून दमदाटी व शिवीगाळ केल्याप्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुळात पत्रकार असल्याचे सांगून शासकीय अधिकारी, पोलीस प्रशासन यांच्यावर छाप पाडण्यासाठी प्रसंगी त्यांच्याकडून कार्यक्रमाच्या नावाखाली बेकायदेशीर पणे पैसा गोळा करण्याचे कृत्ये करण्याचे कृत्ये करीत असल्याची दहशत निर्माण करीत आहे. कर्जत तालुक्यातील गुंडगे गावातील राहणारा राजेंद्र जंगम यांच्याकडे पत्रकारितेची कुठलाही प्रकारे डिग्री व शिक्षण नसतानाही पत्रकार असल्याचे भासवून कर्जतकरांची, पोलिस प्रशासनाची
दिशाभूल करीत आहे याशिवाय चार ओळींच्या बातम्या लिहिता येत नाही फक्त पत्रकार म्हणून मिरवत लोकांना त्रास देण्याचा उपद्रव सुरू केला आहे . याउलट कर्जतमधील प्रतिष्ठीत पत्रकारांनी त्यांच्याविरोधात कर्जत पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत कर्जत पोलीसांनी तक्रारी नुसार कलम १४९ नुसार नोटीस बजावून कारवाई केली असल्याचे वृत्त आहे.

पोलिस प्रशासन अशा प्रेस ओळखपत्र वापरणाऱ्या बोगस ओळखपत्र वापरणाऱ्या राजेंद्र जंगम व्यकतीची चौकशी करण्याची मागणी होत आहे. अशा लोकांची शासनदरबारी पत्रकार असल्याची नोंद आहे का???अशा लोकांना प्रेस ओळखपत्र कोणी दिली??? संघटनेचे ओळखपत्रे कोणाकोणाला दिली??? याबाबत पोलिस तपास करीत आहेत. दिनांक ४/५/२०२० रोजी रात्री उशिरापर्यंत गुंडगे गावातील महिलेने तिला शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात राजेंद्र सखाराम जंगम रा.गुंडगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहे.