Home विदर्भ यवतमाळ पोलिसांनी साजरा केला अपंग जरीनचा वाढदिवस…!

यवतमाळ पोलिसांनी साजरा केला अपंग जरीनचा वाढदिवस…!

160

यवतमाळ / अकोला बाजार – किडनी आजाराने ग्रस्त असलेल्या एका अपंग चिमुकलीचा वाढदिवस साजरा करून यवतमाळ पोलिसांनी कोरोनाच्या या लाॅकडाउनमध्ये अभिनव असा उपक्रम केला .

यवतमाळ येथील कळंब चौक कुरेशी पु-यातील नऊ वर्षीय जरीन समीर शेख या अपंग मुलीचा पोलीस दलातर्फे तीचे घरी जाऊन वाढदिवस साजरा करण्यात आला.ही चिमुकली किडनीच्या आजाराने ग्रस्त आहे. तीला मागील वर्षभरात मिळालेले खाऊचे पैसे तीने एका डब्यात जमा केले होते. आपल्या पिजी बॅक मध्ये जमा झालेली खाऊची रक्कम जरीनने कोव्हीड 19 सारख्या रोगाचा सामना करण्यासाठी मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये जमा करण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप शिरसकर यांचेकडे सुपुर्द केली. अशा परिस्थितीत या चिमुकलीने शासनास केलेली ही मदत फार मोलाची आहे.
” लहान जरी असलो आम्ही तरी मोठे आमचे मन ,
कोरोनाचा सामना करूया मिळुनी आपण सारे जण “
असा सुंदरसा संदेश तीने आपल्या कृतीमधुन दिला आहे. यवतमाळ पोलिसांनी कोरोनाच्या लाॅकडाउनचे परिस्थितीत अपंग चिमुकलीचा तीचे घरी जाऊन वाढदिवस साजरा करीत दिलेली भेट यवतमाळ वासीयांसाठी मोठी दिलासा दायक व प्रेरणादायी आहे.
जरीनचे वडील समीर शेख यांनी पोलीस प्रशासनाचेे आभार व्यक्त करून कोरोना संसर्ग पसरू नये याकरिता नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले. सोशल डिस्टंसींगचे नियम पाळुन मोजक्या लोकांमध्ये वाढदिवस साजरा झाला .यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप शिरसकर , सहाय्यक पोलीस निरीक्षक सुषमा बावीस्कर व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.