Home सातारा कोरोनामुळे छायाचित्र कार व्यवसाय जागेवर , छायाचित्रकारांवर उपासमारीची वेळ

कोरोनामुळे छायाचित्र कार व्यवसाय जागेवर , छायाचित्रकारांवर उपासमारीची वेळ

247
0

शासनाकडून मदतीची अपेक्षा

मायणी – सतीश डोंगरे

सातारा – मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये साखरपुडा लग्न समारंभ वाढदिवस डोहळ विविध प्रकारची उद्घाटने आधी शुभ कार्याची रेलचेल असते मात्र यंदाचा लग्न हंगाम कोरोना प्रभावामुळे अडचणीत आल्याने फोटोग्राफर आर्थिक संकटात सापडले आहेत फोटोग्राफर व व्हिडिओ ग्राफर बांधवांचा प्रमुख आधार असलेला लग्न समारंभ हंगाम कोरोनामुळे प्रभावित झाल्यानंतर विविध फोटोग्राफर बांधवांच्या चेहऱ्यावर चिंता पसरल्या आहेत लग्न हंगामातुन होणार्‍या उलाढालीवरच फोटोग्राफरचा वार्षिक आर्थिक व्यवहार अवलंबून असतो अशा स्थितीत लग्न हंगामच बसलेला फटका फोटोग्राफर बांधवांची आर्थिक घडी विस्कटली आहे बेरोजगारी सततचा दुष्काळयाला कंटाळून वेगळी वाट म्हणून तसेच आपल्या छंद्यातून अनेकांनी फोटोग्राफी व्यवसाय सुरू केला दरम्यानच्या काळात फोटोग्राफी व्यवसायात होणारे बदल स्पर्धा नवीन आधुनिक सामग्रीचा होणारा वापर या पार्श्वभूमीवर स्पर्धेत टिकण्यासाठी व लग्न हंगामाची तयारी म्हणून महिन्यापूर्वी उसनवारी करत लाखो रुपयांची जुळवाजुळव करत कॅमेरा व पूरक साहित्य खरेदी केले हंगाम चांगला होऊन आर्थिक उलाढाल झाल्यावर कॅमेरासाठी गुंतवलेले पैसे वसूल होतील अशी आशा बाळगून अनेक छायाचित्रकार लग्न ऑर्डर घेण्यास सुरुवात केली मात्र दुर्दैवाने करोनाचे संकट आले लाँकडाँऊन जमावबंदी सुरु झाली यातच कोरोना रोखण्यासाठी जमावबंदी आवश्यक असल्याने लग्न समारंभ थांबले परिणामी अनेक छायाचित्रकार आर्थिक अडचणीत अडकले आहेत सद्यस्थितीचा विचार करता धुमधडाक्यात लग्न समारंभ सुरू व्हायला किती वेळ लागेल हे अनिश्चित असल्याने फोटोग्राफर व्यवस्था सुरळीत होण्यासाठी वेळेस लागणार आहे या पार्श्वभूमीवर लग्न हंगाम तयारीसाठी छायाचित्रकारांनी कॅमेरा व इतर साहित्य उसनवारीने व स्वतःच्या जवळील तसेच बँकेचे कर्ज घेऊन गुंतवलेले पैसे वसूल कधी होणार व कसे होणार हा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला असून आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे अशा परिस्थितीत आता करायचं काय हा प्रश्न हजारो छायाचित्रकार समोर उभा राहिला आहे वेगवेगळ्या सुखाच्या जल्लोषाच्या कार्यक्रमात छायाचित्रकार इतरांचे सुखाचे क्षण टिपताना छायाचित्रकारांना परिश्रम घ्यावे लागतात मात्र यामुळे निर्माण झालेली सद्यस्थिती व संकटात आलेला लग्न संग्राम दुखत निर्माण करणारा ठरत आहे कारण लग्न समारंभ यावरच फोटोग्राफी व्यवसाय अवलंबून आहे नंतर यंदाचा लग्नसमारंभ नेहमीप्रमाणे होऊ शकत नाही त्यात आता इच्छुकांनी लग्नसोहळे सोहळे साधेपणाने व रजिस्टर पद्धतीने साजरे करण्याचे निर्णय घेतले परिणामी छायाचित्रकार बांधवांचे आर्थिक विस्कळीत झाली आहे त्यामुळे अनेक छायाचित्रकार बांधवावर उपासमारीची वेळ आली फोटोग्राफर हेकला फोटोग्राफी व्यवसाय असलेले असतात अशा स्थितीत बहुतेकदा येथे आर्थिक अडचणींचा सामना करत व्यवसाय सांभाळतात अलीकडे मोबाईल फोटोग्राफीचा फटका व्यवसायाला बसला असताना रोजंदारी मिळणे हे काहीसा काहींसाठी अवघड बनले याशिवाय दुकानाचे भाडे रक्कम ही अनेकांना परवडत नाही एकूण विविध अडचणींना तोंड देत असताना आता कोरोनामुळे व्यवसाय जागेवर थांबला आहे यामुळे जिल्ह्यातील सुमारे हजारो फोटोग्राफर व व्हिडिओ ग्राफर मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत केवळ फोटोग्राफी व्यवसाय हाच कुटुंबाचा उत्पादनाचे एकमेव साधन असणारे अनेक फोटोग्राफर आहेत मागील वर्षी लग्न झालेल्या अनेकांकडे फोटोची बाकी आहे ती बाकी जमा झाल्यास आडचणी कमी होण्यास मदत होणार आहे.
फोटोग्राफी ही एक कला आहे या कलेवर छायाचित्राचे चित्रकाराचे कुटुंब चालते शिवाय विविध अडचणींना तोंड देत असतानाच आता कोरोनामुळे व्यवसाय जागेवर बसला आहे त्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण होत आहे.

सतीश डोंगरे मायणी फोटोग्राफर. सिध्दनाथ फोटो स्टुडिओ मायणी

जिल्ह्यामध्ये फोटोग्राफर व्हिडिओ ग्राफर छायाचित्रकार उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे छायाचित्रकारांना शासनाने मदत करावी असे प्रतिपादन ज्येष्ठ फोटोग्राफर मार्गदर्शक आयाज मुल्ला वडुज यांनी केले.