Home रायगड कर्जत शहरात ग्राहकांची लुटमार करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

कर्जत शहरात ग्राहकांची लुटमार करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

317

कर्जत – जयेश जाधव

ग्राहक म्हणजे बाजार पेठचा राजा आजच्या जागतिकीकरण युगात हा ग्राहक राजा अतिशय महत्त्वाचा भाग झाला आहे. ग्राहक हा बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल आणि खरेदी विक्रीचा केंद्रबिंदु आहे,पण कर्जत शहरातील बाजारपेठेत शा. पुनमचंद फुलाजी अॅन्ड सन्स किराणा मालाचा व्यापारी दुकानदाराने चक्क ग्राहकाची फसवणुक व लुटमार करीत असल्याचे दिसून येत आहे. मोबाईल, डिश टीव्ही रिचार्ज प्रत्येक रिचार्ज मागे दहा रुपये घेऊन ग्राहकांची लूट करीत आहे.याशिवाय त्यांच्याकडे मोबाईल रिचार्ज व अन्य गोष्टीचा कुठलाही प्रकारे परवानगी नसतानाही किराणा दुकानादार बिनधास्त पणे नागरिकांची लुट व फसवणुक करीत आहे. तरी अशा
मुजोर व लुट करणाऱ्या व्यापाराची कर्जत पोलिसांनी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

ग्राहक संरक्षण कायदा १९८६ नुसार ग्राहकांना वस्तु निवडणे त्याची गुणवत्ता आणि दर्जा याचा प्रमाणे जाणुन घेण्याचा अधिकार आहे आणि ग्राहकाची फसवणुक रोखण्यासाठी जिल्हा ग्राहक मंच ग्राहक न्यायालय आणि जिल्हा तक्रार निवारण ही प्रणाली राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहे,कर्जत शहरात किरकोळ किराणावाले नागरिकाची कोरोनाचा व्हायरलच्या व संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर लुटमार करीत आहेत त्यामुळे ग्राहकांची लुटमार करणाऱ्या अशा व्यापाऱ्यांवर कर्जत पोलीसांनी कारवाई करण्याची मागणी होत आहे.

कर्जत शहरातील बाजारपेठेत फुलाजी अॅन्ड सन्स किराणा दुकानादार प्रत्येक डिश रिचार्ज मागे दहा रुपये उकळुन ग्राहकांची लूट करीत असून हि आमची ग्राहकांची फसवणूक आहे.पोलीसांनी अशा दुकानदारांवर कारवाई करणे अपेक्षित आहे”

‌वैजयंती जाधव – ग्राहक