Home महत्वाची बातमी 3 मे पर्यंत राज्यात कोणतीही दुकान सुरू होणार नाही , आरोग्य मंत्री...

3 मे पर्यंत राज्यात कोणतीही दुकान सुरू होणार नाही , आरोग्य मंत्री राजेश टोपे ,

92
0

अमीन शाह

“३ मेपर्यंत महाराष्ट्रात कोणतीही दुकानं सुरु होणार नाहीत असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारने काल रात्री उशिरा काही निर्देश दिले आहेत. ज्यानुसार काही दुकानांना, व्यवहारांना केंद्र सरकारने संमती दिली आहे. मात्र जोपर्यंत राज्य शासन यामध्ये निर्णय घेत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात असलेली दुकानं सुरु करण्याचा काही प्रश्नच येत नाही. काल रात्री केंद्राने काही निर्णय घेतले आहेत. मात्र अद्याप राज्य सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही” असं टोपे यांनी म्हटलं आहे.
लॉकडाउन हा कदाचित ३ मेपर्यंत जसा आहेत तसाच सुरु राहिल. ३ मे नंतरच याबाबतीतला निर्णय होईल. मी कदाचित अशासाठी म्हणतो आहे की २७ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आहे. त्यावेळी काही वेगळा निर्णय घेतला गेला तर तो माननीय मुख्यमंत्री सांगतीलच असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते