Home विदर्भ वर्धा जिल्हातील अल्लीपुर येथे दोघांच्या वादात एकाची हत्या.!

वर्धा जिल्हातील अल्लीपुर येथे दोघांच्या वादात एकाची हत्या.!

69
0

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

अनैतीक संबधातून खून झाल्याचा संशय.

वर्धा – जिल्ह्यात हिगंणघाट तालुक्यातील अल्लीपुर येथे दोघांच्या वादात एकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना आज पहाटेच्या दरम्यान घडली आहे.
हमीद पठान असे मृतक व्यक्तीचे नाव आहे. गावातीलच एका इसमाच्या पत्नीचे अनैतिक संबध असल्याच्या संशयावरून आरोपी व मृतक यांचेशी वाद झाला . या वादात आरोपी याने हमीद पठान यांच्या ठोक्यावर दगड टाकला असता हमीद पठान हे गंभीरपणे जखमी झालेत. ही माहीती पोलीसांना मिळताच घटना स्थळी पोलीस दाखल होवून जखमीना दवाखान्यात नेत असतांनाच पठान यांचा मृत्यू झाला. पोलीस निरीक्षक योगेश कामाले ,सहाय्यक पोलीस निरीक्षक गनेश बैरागी ,जमादार संजय रीठे ,संजय वानखेडे ,पोलीस कर्मचारी पिसे घटना स्थळी पोहचुन घटनेचा पंचनामा करून मृतकास शवविच्छेदनासाठी करीता रवाना केले असून अल्लीपूर पोलीस पुढील तपास करीत आहे.