Home बुलडाणा “स्टडी फॉर होम” उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद.

“स्टडी फॉर होम” उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद.

45
0

देऊळगाव माळी येथील म. ज्यो. फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा उत्कृष्ट उपक्रम.

कैलास राऊत – देऊळगाव माळी

बुलडाणा – आज जगात कोव्हिड१९(कोरोना) या रोगाच्या साथीमुळे भारतासह अनेक देश लाॅकडाऊन आहेत. शाळा बंद आहेत. परिक्षा रद्द झाल्या आहेत. लाॅकडाऊनच्या काळात आपला शालेय अभ्यास थांबू नये यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत राज्य शालेय शिक्षण विभागाच्या वतीने राज्यात शाळा बंद पण शिक्षण आहे .अशा पध्दतीने आपल्या येथे दि.१४ एप्रिल पासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाची सुरुवात जिल्ह्यातील दि ११ एप्रिल २०२० रोजी जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. श्रीराम
पानझाडे यांनी घेतलेल्या जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांच्या व्हीडीओ कॉन्फरन्सने झाली.
त्यानंतर शिक्षणाधिकारी साहेब यांच्या आदेशावरून प्राचार्य विश्वऩाथ बाहेकर यांच्या संकल्पनेतून व म. ज्यो.फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य व पर्यवेक्षक म.वि. गाभणे यांच्या नियोजनात वर्ग ५ ते ११ वीच्या विद्यार्थ्यांकरिता स्टडी फॉर होम, संकल्पनेतून वर्गशिक्षकांनी वर्गनिहाय व्हाट्सअप गृप तयार करून विद्यार्थ्यांसह पालकांना गृपमध्ये समाविष्ट केले. व तशा पद्धतीच्या सूचना देण्यात आल्या.
१४ एप्रिल पासून माध्यमिक शिक्षण विभागाकडून प्राप्त आॅनलाईन अभ्यास वर्ग ५ ते ११ करिता त्या-त्या गृपवर विषय निहाय पाठवल्या जातो. शैक्षणिक व्हिडिओज, दिक्षा अॅप आॅनलाईन पुस्तके, प्रश्नावली, कृतीपुस्तीका, शैक्षणिक प्रयोग व उपक्रम याशिवाय आॅनलाईन टेस्ट घेवून ते विद्यार्थ्यांनी केलेले कार्य हे तपासले जाते मुख्याध्यापक,पर्यवेक्षक वर्गशिक्षक,विषयशिक्षक परिश्रम घेत आहेत. या उपक्रमात विद्यार्थी व पालकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या लॉक डाऊन च्या काळात एरवी मोबाईल वर खेळणाऱ्या मुलांना व त्यांच्यासोबत पालकांना शैक्षणिक कार्यात सहभागी करून घेण्याचा आनंद हा घेता येत आहे व अतिशय चांगला प्रतिसाद ग्रामीण भागातील कार्यात मिळत आहे. सर्व पालकांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये देखील एक समाधानाची भावना व शिक्षण प्रक्रिया अखंड सुरू ठेवल्याबद्दल सर्व शिक्षकां चे कौतुक परिसरात होत म. ज्यो.माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दे माळी येथील प्राचार्य ,पर्यवेक्षक,शिक्षक बंधू आणि भगिनींचा सक्रीय सहभाग आहे. या अभिनव उपक्रमाची चर्चा व कौतुक पालक वर्गात मोठ्या प्रमाणात होत आहे.

Unlimited Reseller Hosting