Home महत्वाची बातमी धक्कादायक , पोलिसाला बेदम मारहाण करून खड्ड्यात लोटून दिले ,

धक्कादायक , पोलिसाला बेदम मारहाण करून खड्ड्यात लोटून दिले ,

63
0

धक्कादायक , पोलिसाला बेदम मारहाण करून खड्ड्यात लोटून दिले ,

9 हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला ,

अमीन शाह

आळंदी – रात्रपाळीला जाणाऱ्या पोलिसाला 3 अज्ञातांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. त्यानंतर खिशातील किमती ऐवज काढून पोलिसाला चक्क रस्त्यालगतच्या खड्ड्यात ढकलून दिले. ही धक्कादायक घटना २१ एप्रिल लोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास आळंदी येथील रासे गावाजवळ घडली. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात 3 अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी इंद्रकुमार तुकाराम धोत्रे (३०, रा. आळंदी) हे रात्रपाळी असल्याने दुचाकीवरून आळंदी येथून चाकणकडे येत होते. आळंदी घाटात येताच अज्ञातांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. लाकडी दांडक्याने मारहाण करून धोत्रे यांच्या खिशातील 4 हजारांची रोकड आणि मोबाईल असा 9 हजारांचा ऐवज काढून घेतला. एवढ्यावल न थांबता आरोपींनी धोत्रे यांना रस्त्यालगतच्या खड्ड्यात ढकलून घटनास्थळावरून पळ काढला.
दरम्यान, रस्त्याने जाणाऱ्या एका पोलिसाने धोत्रे यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला पडलेली दिसली. त्या पोलिसाने चंद्रकांत धोत्रे यांचा शोध घेतला असता ते रस्त्याजवळ असलेल्या खड्ड्यात पडले होते. त्या पोलिसाने जखमी धोत्रे यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. धोत्रे यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्लेखोरांचा शोध पोलीस घेत आहेत.