Home बुलडाणा लोणार शहरात पोलिस प्रशासन तथा महसूल व नगर प्रशासनाच्या जनजागृती मार्च दरम्यान...

लोणार शहरात पोलिस प्रशासन तथा महसूल व नगर प्रशासनाच्या जनजागृती मार्च दरम्यान मुस्लिम समाजाचा अनोखा उपक्रम

224
0

प्रा.तनज़ीम हुसैन

बुलडाणा – जागतिक दर्जा प्राप्त असलेल्या लोणार शहरात दिनांक १९ एप्रिल २०२० रोजी पोलीस प्रशासन, महसूल,आरोग्य आणी नगर प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानाने नागरिकांमध्ये जनजागृती करिता पैदल मार्च /पदचलन रॅलीचे आयोजन करण्यात आले.

संपूर्ण शहरभर या रॅलीने पदयात्रा करून कोरोना विषाणू संदर्भात असलेले गैरसमज, भीती व दहशत दूर करून या यापासून बचाव होण्याकरीता उपायोजना व मार्गदर्शक सूचना शहरवासीयांना दिले तसेच संपूर्ण शहरवासीयांनी आपापल्या घरी राहूनच सहयोग देण्याचे व वैयक्तिक आणी परिसर स्वच्छता कडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन नगर प्रशासनाच्यावतीने करण्यात आले. अफवा न पसरवणे व सोशल मीडियाचा जाणीवपूर्वक उपयोग करण्यासंदर्भात पोलिस प्रशासनाच्या वतीने सूचना देण्यात आले. एकीकडे संपूर्ण देशामध्ये कोरोना संक्रमणाचा हाहाकार असतांना मात्र लोणारच्या स्थानिक प्रशासनाने यावर मात करून संपूर्ण तालुका आज पर्यंत एका लहान बाळासारखे आपुलकीने जपून आणी प्रेमाने संभाळून ग्रीन झोन मध्ये ठेवला आहे. रात्र – दिवस पोलिस प्रशासन नगर प्रशासन, आरोग्य विभाग तसेच महसूल प्रशासनाचे कमालीचे योगदान लोणार तालुक्याला लाभले आहे. श्री सैफन नदाफ, इन्सिडेंट कमांडर तथा तहसीलदार लोणार, श्री रवींद्र देशमुख,पोलीस निरीक्षक,पोलीस स्टेशन लोणार, पीएसआय अजहर शेख, श्री विठ्ठल केदारे , मुख्याधिकारी नगरपरिषद लोणार तसेच लोणारचे आरोग्य निरीक्षक मा.श्री फेरोजशहा, ग्रामीण रुग्णालय लोणार या सर्व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य पार पाडून एक उदाहरण कायम केले. त्यांनी केलेले उत्तम कामगिरीबद्दल त्यांना आदर व सन्मान मिळावा या हेतूने लोणार तालुक्याला नायक ठरलेले या तरुण अधिकाऱ्यांचे तसेच सर्व कर्मचाऱ्यांचे सन्मानार्थ पदलन दरम्यान मुस्लिम समाजाच्या वतीने जामा मस्जिद चौक ते पोलीस स्टेशन पर्यंत सामाजिक अंतराचे नियम पाळून व रस्त्याच्या दोन्ही बाजूने रांगेत उभे राहून या सर्वांसाठी टाळ्या वाजवले, विविध प्रेरणादायी घोषवाक्य उच्चारून त्यांना उत्तेजना प्रदान करून जय-जय कार केले, पदचलन रॅलीवर फुलांचा वर्षाव केला, हातात पुष्पगुच्छ देऊन व गळ्यात हार टाकून त्यांचा सन्मान केला, त्यांना शुद्ध शितल जल सोबतच रुअब्जा शरबत व इतर घरेलू शीतपेयाची व्यवस्था करण्यात आली. याही पुढे जाऊन सामाजिक कार्यकर्ता तथा जमियते उलमा ए हिंद लोणार शाखेचे सेक्रेटरी श्री हाजी मोहम्मद रिजवान जड्डा यांनी स्वखर्चाने त्यांना संरक्षण कीट म्हणून हॅन्ड ग्लोज,उत्तम दर्जाचे मास्क सेनीटायजर्स व इतर साहित्य सप्रेम भेट म्हणून दिले. या सर्व उपक्रमांमध्ये लोणार मधील मुस्लिम समाजाचे सर्व सामाजिक व राजकीय कार्यकर्ते तसेच तरुण मंडळींनी पुढाकार घेतला, शहरभर या नवोपक्रमाचे कौतुक होत आहे.