Home रायगड आमदार महेंद्र थोरवे यांचे माणुसकीचे दर्शन,मजूर, उत्तर भारतीय कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

आमदार महेंद्र थोरवे यांचे माणुसकीचे दर्शन,मजूर, उत्तर भारतीय कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

742

कर्जत – जयेश जाधव

करोनो विषाणूची लागण होऊन आपणही बांधित रूग्ण होऊ शकतो याची खबरदारी शासन दरबारी घेतली जात आहे.

म्हणुनच देशव्यापी “जनता कफ्यु ” यशस्वी झाल्यानंतर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून एकवीस दिवस लाॅकडाऊन घोषित केले आहे याचा परिणाम दैनंदिन जीवनावर झाला असून गोरगरीब,गरजू,मजूर, कामगार,हातावर पोट भरणारे नागरिकांची मात्र दयनीय अवस्था झाली आहे.काम नसल्याने,रोजगारा अभावी रोजच्या पोट भरण्यासाठी लागणा-या वस्तू विकत कशा घेणार?? त्यांच्या कुटुंबीयांचे पोट कसे भरणार?? या विवंचनेत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे लोकप्रतिनिधी म्हणून ज्याची ओळख आहे असे कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी या गोष्टीचा विचार करून आपल्या परिसरातील मजूर व उत्तर भारतीय कामगारांना पोसरी येथील सुरभी लाॅन्समधे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून माणुसकीचे दर्शन घडविले आहे. महेंद्र थोरवे हे देखील जय महाराष्ट्र कामगार युनियनचे स्व:ता संस्थापक अध्यक्ष आहे.त्यामुळे कामगारांचे प्रश्न,दु:ख याची जाणीव आहे. आमदार थोरवे यांनी कर्जत-खालापूर मतदारसंघातील औद्योगिक वसाहतीतील कारखान्यात काम करीत असलेल्या परप्रांतीय कामगारांची भेट घेऊन त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस करून प्रशासनामार्फत राहण्या -खाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.तसेच अशा नागरिकांना अन्नधान्याचा पुरवठा व रेशनिंग धान्य पोहचवा असे प्रशासनाकडे सूचना केल्या आहेत.त्यामुळे आमदार महेंद्र थोरवे यांच्या रूपाने कामगारांसाठी आशेचा किरण उगवला असल्याचे चित्र दिसत असून त्यांनी माणुसकीचा धर्म पाळत मदतीचा हात पुढे केला त्यामुळे कामगारांनी धन्यवाद दिले.