Home विदर्भ अकोटात युवकांनी दिला मुक्या प्राण्यांना आधार….

अकोटात युवकांनी दिला मुक्या प्राण्यांना आधार….

109

देवानंद खिरकर – अकोट

अकोला – सध्या सुरु असलेल्या सर्वत्र कोरोना विषाणुचा पादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे.अकोट शहरात सुध्दा संचारबंदी लागु आहे.अशात गोरगरीब गरजू नागरिकांना विविध सामाजिक संस्था कार्यकर्ते व प्रशासनातर्फे अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे.परंतू अशा स्थितीत शहरातील बेवारस भटके श्वान भुकेमुळे व्याकुळ होऊन अन्नाचा शोध घेत आहे.ही बाब शहरातील काही युवकांच्या लक्षात आल्या नंतर त्यांनी या श्वानाकरीता बिस्किट,ब्रेड,ची व्यवस्था करुन त्यांना आधार दीला.या माध्यमातून त्यांनी सदह्रदयतेचा परिचय देत प्राणीप्रेम जोपासण्याचा संदेश दिला.शहरातील बाजारपेठ,खानावळी,हाटेल,व ईतर दुकाने बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट आहे.त्यामूळे बेवारस श्वानांचे भुकेने हाल होत आहे.ही परिस्थिती निनाद मानकर,प्रज्वल नांदूरकर आदी युवा सामाजीक कार्यकर्त्याच्या लक्षात आली.त्यांनी स्वखर्चाने बिस्किट,ब्रेड आणून रस्त्या वर भुकेने कासावीस होत असलेल्या श्वानांना दिले.या उपक्रमातून युवकांनी भूतदयेचा संदेश दिला.