Home महाराष्ट्र नागपूर शहरातील जनधन योजनेअंतर्गत महिलांना 500 रुपये वाटप सुरू ,

नागपूर शहरातील जनधन योजनेअंतर्गत महिलांना 500 रुपये वाटप सुरू ,

31
0

महाराष्ट्र बँक देवनगर शाखेने केले नियोजन ,

पोलीसवाला ऑनलाईन मीडिया

नागपूर, दि.3 (प्रतिनिधी): नागपूर शहरातील जनधन योजनेतंतर्गत महिलांना देण्यात येणारे 500 रुपये वाटपाचे काम सुरू झाले असून त्यासाठी महाराष्ट्र बँकेने नियोजन केले असून त्यानुसार येथील देवनगर शाखेतील 382 महिलांनाही या योजनेतंर्गत लाभ मिळणार असून त्या बाबतचे काटेकोर नियोजन करण्यात आलेले असून सोशल डिस्टैनन्स पाळून हे वाटप करण्यात येणार असल्याचे शाखा व्यवस्थापक संतोष रामगिरवार यांनी सांगितले.

केंद्र सरकारने पंतप्रधान जनधन योजेनतंर्गत महिला खातेधारकांसाठी कोरोना – 19 मुळे लॉकडाऊन परिस्थितीत महिलांना तीन महिन्यांसाठी 500 रुपयाचे अनुदान जाहीर केलेले आहे. त्यानुसार या खातयावर 500 रुपये जमा करण्यात आलेले आहेत. ते काढण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रने नियोजन केलेले असून ज्या खाते क्रमांकाच्या शेवटचा अंक 0 ते 1 असेल त्यांना 3 एप्रिल रोजी, खाते क्रमांकाचा शेवटचा अंक असणाऱ्या 2 ते 3 असेल 4 एप्रिल रोजी, 4 व 5 शेवटचा अंक असणाऱ्यांनी 7 एप्रिल रोजी, 6 व 7 शेवटचा अंक असणाऱ्यांनी 8 एप्रिल रोजी, 8 व 9 अंक शेवटचा अंक असणाऱ्यांनी 9 एप्रिल रोजी आपआपल्या शाखेत हे अनुदान वाटप करण्यात येणार आहे. नागपूर शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र देवनगर शाखेतर्फेही या शाखेतील 382 महिलांना हे वाटप करण्यात येणार असल्याचे शाखा व्यवस्थापक संतोष रामगिरवार यांनी सांगितले. या संदर्भात माहिती देताना त्यांनी सांगितले की, बँकेनी वरील प्रमाणे वेळापत्रक हे वाटप करण्यासाठी ठरवलेले असून ज्या महिलांना हे अनुदान मिळालेले आहेत त्यांच्या मोबाईलवर आदल्या दिवशीच पैसे जमा झाल्याबाबत मेसेज जाणार असून त्यांनी आपल्याला ठरवून दिलेल्या दिवशी शाखेत येऊन पैसे काढून घ्यावे अस आवाहन केले आहे. या शाखेत शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सोशल डिस्टेन्सचे परिपूर्ण पालन करण्यात येत असून प्रवेशद्वाराचया बाहेरच दोन दोन मिटर अंतरावर ग्राहकांना बसवून पाच – पाचच्या गटाने बँक शाखेत सोडण्यात येऊन त्यांना कोरानाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितरीत्या व्यवहार करण्यास बँकेचे कर्मचारी- अधिकारी सहकार्य करत आहेत.

Unlimited Reseller Hosting