Home बुलडाणा साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तान मध्ये सभा मंडपाचे आमदार मनोज कायंदे यांच्या...

साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तान मध्ये सभा मंडपाचे आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न ,

540

 

 

साखरखेर्डा प्रतिनिधी जुबेर शाह

साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तान परिसरात नव्याने सभामंडप उभारणीच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. ना. मनोजभाऊ नंदाताई देवानंद कायंदे (आमदार, सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ) यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी आमदार निधीतून १०.०० लाख रुपये निधि मंजूर करण्यात आला असून
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. अॅड. नाझेर काझी साहेब (प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – अल्पसंख्यांक विभाग) होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. इरफानअली शेख (प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र राज्य) उपस्थित होते.
या कामामुळे परिसरातील मुस्लिम समाज बांधवांना नमाज पठन व इतर सामाजिक कार्यक्रमांसाठी सुविधा उपलब्ध झाली आहे ,
मुस्लिम समाज कबरस्थान मध्ये पाणी ची टाकी , पाइपलाइन , रस्ते संरक्षण भीत , गार्डन , हाइमर लाइट इत्यादि सर्व सुविधा देण्यासाठी येथील मुस्लिम समाजाचे युवा कार्यकर्ते
युनस शाह, अशपाक शाह, असलम शाह, मन्नान शाह, आसिफ कुरेशी, जुबेर शाह इत्यादिनी गेल्या वर्षी पासून विशेष प्रयत्न केले होते व या साठी देउलगावराजा येथे मुस्लिम समाज बांधवांची बैठक ही आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीत सदर प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता त्या नंतर अँड ,नाजेर काजी , इरफान अली यांनी आमदार मनोज कायंदे यांच्या कड़े विशेष पाठ पुरावा केला होता त्या मुळे येथील मुस्लिम समाज कबरस्थान मध्ये जनाजा नमाज पठन करण्यासाठी नवयाने समाज सभागृह मंजूर करण्यात आला
आहे त्या नंतर इतर विकासाची कामे केली जानार आहे शनिवार ला सम्पन्न झालेल्या भूमि पूजन सोहल्यात आशीष पोंधे , मा , सरपंच सुनील भाऊ जगताप , आबेद पठाण, महोम्मद समिऊल हक, शेख राजिक, मुहम्मद अफसर, अन्सार शाह, नईम पठाण, शेख अर्शद, तहेजीब शाह, शारिक शाह, शाहरुख खान, अजीम कुरेशी, शेख आसिफ कुरेशी व मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.