Home बुलडाणा कुरेश कॉन्फरन्स सिंदखेडराजा तालुकाध्यक्षपदी अर्शीद रशीद कुरेशी

कुरेश कॉन्फरन्स सिंदखेडराजा तालुकाध्यक्षपदी अर्शीद रशीद कुरेशी

105

 

बुलडाणा…………….प्रतिनिधी

कुरेशी समाजबांधवांच्या संघटनासाठी देशपातळीवर सक्रीय असलेल्या कुरेश कॉन्फरन्सच्या सिंदखेराजा तालुकाध्यक्षपदी अर्शीद रशीद कुरेशी यांची आज बुलडाणा येथे समाजाच्या चवथ्या राज्यस्तरीय अधिवेशनात एका पत्रानव्ये नियुक्ती करण्यात आली.अर्शीद रशीद कुरेशी संघटनकौशल्याची देणगी लाभलेले एक कुशल कार्यकर्ते असून त्यांची ही नियुक्ती संघटनाबांधणीच्या दृष्टीने निश्चितच सहाय्यभूत ठरणार आहे.

4 एप्रिल रोजी बुलढाणा येथे राष्ट्रवादी भवनात कुरेश कॉन्फरन्सचे चौथे राष्ट्रीय अधिवेशन समाजबांधवांच्या विक्रमी उपस्थितीत थाटामाटात पार पडले.या अधिवेशनात राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय,तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.सिंदखेडराजा तालुका कुरेश कॉन्फरन्सच्या तालुकाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र अर्शीद रशीद कुरेशी यांना कुरेश कॉन्फ्रेंस चे राष्ट्रीय अध्यक्ष अडव्हकेट सनोबर अली कुरेशी सुप्रीम कोर्ट दिल्ली यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले, यावेळी महाराष्ट्र प्रदेश कार्यअध्यक्ष ज़ाकिर भाई कुरेशी,जिल्हाध्यक्ष अब्दुल रफीकसेठ कुरेशी, साखरखेर्डा ग्रामपंचायतचे मा सरपंच दाऊदसेठ कुरेशी,जावेद कुरेशी इत्यादी मान्यवरांचा कॉन्फरन्स तर्फे शाल स्मृतीचिन्ह देऊन यथोचित्य सत्कार करण्यात आला.
यावेळी कुरेश कॉन्फरन्सचे देशभरातून आलेले पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.अर्शीद रशीद कुरेशी यांची तालुकाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या मित्रपरिवाराने त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे, आगामी काळात गाव तिथे कुरेश कॉन्फरन्सची शाखा तातडीने स्थापण्याचा मनोदय अर्शीद रशीद कुरेशी यांनी व्यक्त केला आहे.