Home बुलडाणा गुंज मारहाण प्रकरणातील आरोपी अटकेत : ४ आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी

गुंज मारहाण प्रकरणातील आरोपी अटकेत : ४ आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी

592

 

साखरखेर्डा : (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या मौजे गुंज येथे शिवजयंती मिरवणुकीत
डिजेच्या आवाजावरून दोन गटात तुंबळ हाणामारी होऊन पाच जण जखमी झाले होते. पोलिसांनी परस्पर विरोधी तक्रारीवरून गुन्हे दाखल करुन एका आरोपीस अटक केली होती
तर इतर आरोपी फरार होते. तपासादरम्यान शाम सुरेश तुपकर, पवन परसराम तायडे आणि अक्षय रामकिशन तुपकर या तिघांना २० मार्च रोजी अटक करण्यात आली. सुरुवातीला न्यायालयाने त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर २१ मार्च रोजी न्यायालयात हजर केले असता तिघांनाही न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
दरम्यान या प्रकरणातील इतर फरार आरोपींचा शोध साखरखेर्डा पोलीस घेत असतांनाच दि. १ एप्रिल रोजी अमोल सुरेश तुपकर, गजानन केशव तुपकर, ऋतिक गजानन तूपकर, कडूबा मनोहर तुपकर या चार आरोपीना अटक करुन त्यांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली होती. या चारहीg जणांना २ एप्रिल रोजी कोर्टात हजर केले असता त्यांची बुलढाणा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.