Home यवतमाळ गॅस सिलेंडरसाठी वंचित रस्त्यावर…!

गॅस सिलेंडरसाठी वंचित रस्त्यावर…!

156
सिलेंडर कधी मिळणार..?
वंचितचा मोदींना सवाल..

देशात आणि महाराष्ट्रात नरेंद्र मोदीच्या चुकीच्या विदेश नीतीमुळे तसेच अमेरिका राष्ट्राध्यक्षाच्या पुढे शरणागती पत्करल्यामुळे भारत सरकारने आपला मित्रदेश असलेल्या इराणला डावलून अमेरिका धार्जिणे धोरण स्वीकारल्यामुळे देशात अभूतपूर्व गॅस सिलेंडर तुटवडा, डिझेल-पेट्रोल महागाई, मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे.
गॅस सिलेंडर हा सर्वसामान्य जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न असून आज समाजातील गरीब, मध्यमवर्गीय, ऑटोरिक्षा चालक, कॅटरिंग व्यावसायिक, हॉटेल मालक इत्यादींची रोजी रोटी संकटात सापडली आहे. अशा अवस्थेमध्ये देशातील विरोधी पक्ष आणि इतर कोणतेही राजकीय पक्ष जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर आल्याचे दिसत नाही. मात्र वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी दिनांक ६ एप्रिलला महाराष्ट्र व्यापी आंदोलन उभारून *नरेंदर..कब मिलेगा सिलेंडर.?* असा सवाल पंतप्रधानाला केला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात डॉ. नीरज वाघमारे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यवतमाळ, यांच्या नेतृत्वात संविधान चौकात प्रचंड मोठे आंदोलन उभारून आंदोलक महिलांनी चुल पेटवून भाकरी थापल्या. आणि सिलेंडर तुटवड्याचा निषेध नोंदवला. सरकारच्या चुकीच्या धोरणाने सर्वसामान्य गृहिणींना पुन्हा एकदा चुलीकडे जायला भाग पाडले आहे, अशा सरकारचा निषेध नोंदवला. शिष्टमंडळांनी भाकरी,कांदा आणि मीठ जिल्हाधिकारी यवतमाळ यांना देऊन एका निवेदनाद्वारे या धोरणाचा निषेध नोंदवला आहे.
हे आंदोलन यवतमाळ जिल्ह्यात एकाच वेळेला सर्व तालुक्यांमध्ये केले जात असून सर्वसामान्य जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. वंचित बहुजन आघाडी ही सदैवच सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर आलेली असल्याचे उपस्थितानी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष डॉ.नीरज वाघमारे, मीराताई वीर- नगरसेविका, जिल्हा महासचिव- अशोक कुमार कयापाक, जिल्हा महासचिव- संजय इंगळे,जिल्हा महासचिव- शिवदास कांबळे,
जिल्हा उपाध्यक्ष विशाल पोले,
उपाध्यक्ष- शैलेश भानवे, उपाध्यक्ष- सचिन राऊत, रवी बच्छराज,आनंद भगत- कायदेविषयक सल्लागार, केशव भागवत- सल्लागार,गजानन कोकाटे – जिल्हाप्रसिद्धीप्रमुख. शहराध्यक्ष- प्रसन्नजीत भवरे, शहर कार्याध्यक्ष- प्रमोद पाटील, शहर महासचिव- विलास वाघमारे, शहर उपाध्यक्ष- अरविंद दिवे, नितेश पाटील, रामदास वीर, उत्तम कांबळे, चंद्रकांत वाळके, देवानंद लोणारे, दिलीप वाकोडे,सुरेश पवार (समाज सेवक)रामराव राठोड,दशरथ राठोड,संजय गुजर, शेतकरी चळवळीचे प्रा. पंढरी पाठे, सचिन मनवर,संतोष मसराम, सचिन मोहोड, रणधीर चव्हाण-यवतमाळ तालुकाध्यक्ष, नामदेव इंगोले, संदीप भगत, राहुल खंतडे,विकास बोरकर, मंगेश पाईकराव, राजेश बनसोड,रविंद्र नगराळे,प्रकाश तायडे, राजेंद्र सातपुडके, महेन्द्र मुनेश्वर,मोहन रूपनर, पुष्पाताई शिरसाठ,भारती सावते, करुणा चौधरी, सविता तिडके, संगीता भवरे, रत्नमाला कांबळे, निशा निमकर, सुकेशनी खोब्रागडे, उषा ढोकणे, शीला अंबादे सुशीला गजभिये,लता भरणे, रेखा गुजर, पल्लवी कांबळे,संध्या काळे व अनेक पक्ष कार्यकर्ते छोटे मोठे व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.