
अमिन शाह
बुलढाणा जिल्ह्यातील कवठळ नजीक झालेल्या 2 मार्च रोजी शिक्षक महिलेचा अपघाती मृत्यू झाला होता. हा मृत्यू अपघाती नसून पत्नीचा सुपारी देऊन खून केल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पतीसह धडक देणारा वाहन चालक या दोघांना अटक केली आहे. सध्या सुपारीसाठी मध्यस्थी करणाऱ्यास अटक करणे बाकी आहे. आरोपींना 7 मार्च रोजी न्यायालयात हजर केले असता 9 मार्चपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे .
नेमकं काय घडलं?
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक वृषाली प्रकाश गावंडे वय वर्ष 37 राहणार पातुर्डा या पिंपळगाव काळे येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. वृषाली यांचे पती प्रकाश अनंत गावंडे यांच्यासह घरातल्यांसह सतत वाद होत असे. त्यामुळे मृतक शिक्षिकेने संग्रामपूर पोलीस स्टेशन मध्ये कौटुंबिक छळाची तक्रार सुद्धा दिली होती. परंतु त्यांनंतर त्यांचा ऐका अपघातात मृत्यू झाला 3 मार्च रोजी त्यां घटना घडल्यानंतर मृतक शिक्षकेचा भाऊ सुमित डोसे याने हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता , त्या नंतर पोलिसांनी सखोल तपास करून सदर अपघात हा अपघात नसून सुपारी देऊन केलेला नियोजित कट असल्याचे समोर आले आहे ,
कसा झाला अपघात?
घटनेची पार्श्वभूमी पाहून जळगाव जामोद पोलिसांनी तपास चक्र वेगाने फिरवत पती प्रकाश अनंत गावंडे वय वर्ष 37 राहणार पातुर्डा व टाटा छोटा हत्ती मालवाहू क्रमांक MH 28 BB 57 53 चा चालक मनीष नारायण सिंग सूर्यवंशी यांनी मृतक वृषाली स्कूटर क्रमांक एम एच 28 एएल 58 15 ला मागून जोरदार धडक देऊन खून केल्याचे उघड केले. सदर प्रकरणात पती प्रकाश व त्याचा मित्र मंगेश चौहूलकर राहणार पातुर्डा यांनी मध्यस्थी करून वाहन चालक मनीष सूर्यवंशी याला एक लाख रुपयाची सुपारी देऊन सदर घटना घडवून आणली होती हे ही पोलिसांच्या तपासात समोर आले सदर घटना उघड़किस आल्या मुळे परिसरात मोठी खलबल उडाली असून पोलिस पुढील तपास करीत आहे ,
या प्रकरणी आरोपी विरुद्ध कलम 106 1 281 भारतीय न्याय संहिता सह कलम 134 177 मोटर वाहन कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली आहे. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेंडगे करीत आहेत.












































