Home बुलडाणा किनगावराजा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त कृषी उपसंचालकपदी निवड झालेल्या रोहित...

किनगावराजा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त कृषी उपसंचालकपदी निवड झालेल्या रोहित गवई यांचा सत्कार ,

119

 

 

किनगाव राजा प्रतिनिधी इसाक कुरेशी

किनगाव राजा : जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, किनगाव राजा येथे गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात विद्यार्थ्यांकडून भाषणे, व पोवाडे विविध सांस्कृतिक उपक्रम सादर करण्यात येणार आहेत.
याच कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत कृषी उपसंचालक (वर्ग–१) पदावर निवड झालेल्या श्री. रोहित गवई यांचा शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांसाठी ते प्रेरणादायी ठरत आहेत.
सदर कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे इसाक कुरेशी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. दोन्ही कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.